Shashank Ketkar: शशांक केतकरनं कचऱ्याच्या ढिगाऱ्याबाबत केलेल्या पोस्टनंतर BMC अ‍ॅक्शन मोडवर; अभिनेता म्हणाला, "फक्त तो परिसर नाही तर..."

BMC: शशांकनं काही दिवसांपूर्वी फिल्मसिटीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर BMC नं अ‍ॅक्शन घेतली आहे.
शशांक केतकरनं कचऱ्याच्या ढिगाऱ्याबाबत केलेल्या पोस्टनंतर BMC अ‍ॅक्शन मोडवर; अभिनेता म्हणाला, "फक्त तो परिसर नाही तर..."
Shashank Ketkarsakal
Updated on

Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. त्याच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. अशातच शशांकनं काही दिवसांपूर्वी फिल्मसिटीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर BMC नं अ‍ॅक्शन घेतली आहे. BMC च्या कर्मचाऱ्यांनी फिल्मसिटीबाहेरील सर्व कचरा हटवला आहे.

BMC अ‍ॅक्शन मोडवर

शशांकनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये मुंबईमधील फिल्मसिटीबाहेर असणारा कचरा दिसत होता. शशांकची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर BMC च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी फिल्मसिटीबाहेरील सर्व कचरा हटवला. त्यानंतर BMC च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यामध्ये लिहिलं होतं, "शशांक केतकर, सदर ठिकाणी काल (दिनांक १३ जून २०२४) स्वच्छता करण्यात आली आहे. धन्यवाद!"

शशांकनं BMC चे मानले आभार

BMC कडून करण्यात आलेल्या स्वच्छतेबद्दल शशांकने BMC चे आभार मानले आहेत. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, “BMC मे तातडीनं अॅक्शन घतली यासाठी मनापासून आभारी आहे. आता पुन्हा तिथे कचरा जमणार नाही यासाठी काहीतरी ठोस पावलं उचला आणि फक्त तो परिसर नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ ठेवूया. मुंबई महापालिके इतकीच नागरिकांचीही जबाबदारी आहे.”

शशांक केतकर
Shashank KetkarSAKAL

शशांकनं शेअर केला होता व्हिडीओ

शशांकनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये फिल्मसिटीच्या बाहेर कचऱ्याचा ढिगारा दिसला. या व्हिडीओला शशांकनं कॅप्शन दिलं, "मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहूलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये. !! मुंबईची  filmcity बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची ???? ही अवस्था , हे चित्र काही आजचं नाहीये… मी गेल्या 10 वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून BMC office समोर ओतला तर आवडेल????? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरीक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे?" या पोस्टमध्ये शशांकनं BMC ला देखील टॅग केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()