Shilpa Shetty: बॉलिवूड सेलिब्रिटी कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावरील अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यांच्यावर आधी सुरु असलेल्या केसेस न्यायालयात सुरु असतानाच आता या दोघांचं नाव आणखी एका प्रकरणात समोर आलं आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलीस ठाण्याला अभिनेत्री शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रावर एका सराफा व्यापाऱ्याने लावलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. रिद्धी सिद्धी बुलियन्सचे व्यवस्थापकीय संचालक, पृथ्वीराज कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने नमूद केल्यानंतर हे निर्देश आले आहेत .
मंगळवारी न्यायालयाने दिलेल्या आदेशात, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एनपी मेहता यांनी शिल्पा आणि राज, त्यांची कंपनी - सत्ययुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड - तसेच कंपनीचे दोन संचालक आणि एक कर्मचारी यांच्याविरुद्ध "प्रथम दृष्टया दखलपात्र गुन्हा दाखल" असल्याचे सांगितलं.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एनपी मेहता यांनी पोलिसांना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत फसवणूक आणि विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
सराफा व्यापाऱ्याच्या वतीने त्यांचे वकील हरिकृष्ण मिश्रा आणि विशाल आचार्य यांनी केलेल्या तक्रारीनुसार, कुंद्रा आणि शेट्टी यांनी 2014 मध्ये एक योजना आणली होती. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांनी अर्ज केल्यावर सवलतीच्या दराने सोन्यासाठी संपूर्ण रक्कम अगोदर भरणे आवश्यक होते. त्यानंतर, मुदत पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या तारखेला सोन्याचे निर्देशित प्रमाणात वितरण केले जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, तक्रारकर्त्यांनी 2 एप्रिल 2019 रोजी 5,000 ग्रॅम 24 कॅरेट सोने मिळण्याची अपेक्षा ठेवून 5 वर्षांच्या योजनेत 90,38,600 रुपये गुंतवले होते. तथापि, योजनेनुसार अपेक्षित असलेले सोने कधीच ठरलेल्या तारखेला वितरित केले गेले नाही हा आरोपींनी कट रचला असून त्यांनी फसवणूक केली आहे आणि विश्वासार्हतेचा भंग केला आहे असं म्हंटलं आहे.
दरम्यान याबाबत शिल्पा आणि राज यांच्याकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलं नाहीये. या आधीही राज कुंद्रावर पोर्नोग्राफिक सिनेमा बनवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.