Thoda Tuza Thoda Maza : समीर- शिवानीची जमली जोडी ; मालिकेच्या नव्या प्रोमोची होतेय चर्चा

स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणाऱ्या थोडं तुझं थोडं माझं मालिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
 Thoda Tuza Thoda Maza
Thoda Tuza Thoda MazaEsakal

स्टार प्रवाहवर लवकरच शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांची मुख्य भूमिका असलेली थोडं तुझं थोडं माझं ही नवीन मालिका सुरू होतेय. एक वेगळी कौटुंबिक कथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

मालिकेचा वेगळा प्रोमो

स्टार प्रवाहने सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, मानसी देवळात देवाच्या पाया पडते आणि सुट्टे पैसे नसल्याने 100 ची नोट देवाजवळ ठेवते तर तेजस तिच्या मागोमाग देवळात येतो आणि त्याच्याकडे पैसे नसतात त्याच्या खिशात असलेला एक रुपया तो मानसीने ठेवलेल्या पैशांवर वाहतो. एकप्रकारे बाप्पा जोडीने त्यांनी वाहिलेली दक्षिण स्वीकारतो. दोघेही गायत्रीविषयी वेगवेगळ्या गोष्टी देवाला सांगतात.

पहा प्रोमो:

भन्नाट कॅप्शन आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया

नातं हे नवसाचं असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं असून अनेकांनी प्रोमोवर कमेंट करत प्रोमो आवडल्याचं म्हंटलं. शिवानी आणि समीरची फ्रेश जोडी अनेकांना आवडली. एक वेगळी गोष्ट पाहायला मिळणार याचा आनंद प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये व्यक्त केला. शिवानी आणि समीर बऱ्याच काळाने स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत यामुळेही प्रेक्षक त्यांना पाहण्यास उत्सुक आहेत.

 Thoda Tuza Thoda Maza
Thoda Tuza Thoda Maza : समीर- शिवानीची जमली जोडी ; मालिकेच्या नव्या प्रोमोची होतेय चर्चा

मालिकेचं कथानक

हुशार मानसी, कष्टाळू तेजस यांची वेगळी लव्हस्टोरी मालिकेत पाहायला मिळणार आहे. काहीतरी बनण्याचं स्वप्न बघणारी मानसी आणि लोभी वहिनीच्या तावडीतून घर सोडवायला धडपडणारा तेजस याची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 17 जूनपासून रात्री 9 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत शिवानी, समीर बरोबर मानसी कुलकर्णीचीही मुख्य भूमिका आहे. तर प्रणव प्रभाकर आणि तृप्ती रवींद्र हे कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

शिवानीने या आधी स्टार प्रवाहवर 'देवयानी', 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकांमध्ये काम केलं होतं. बऱ्याच काळाने शिवानी पुन्हा स्टार प्रवाहवर काम करतेय तर समीरने स्टार प्रवाहवरील 'गोठ' मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलं. तो ही बऱ्याच काळाने या वाहिनीवर कमबॅक करतोय.

 Thoda Tuza Thoda Maza
Shivani Surve: बिग बॉस फेम शिवानी सुर्वेचा तब्बल 9 वर्षांनंतर धमाकेदार कमबॅक; 'या' मालिकेत साकारणार भूमिका, पाहा प्रोमो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com