Madhubala Short Film : 'मधुबाला' लघुपटाची विविध महोत्सवांसाठी निवड; लघुपटाचा प्रोमो सोशल मीडियावर प्रसिद्ध

लघुपटाची निर्मिती येथील नीलअश्‍व स्टुडिओ या प्रॉडक्शन कंपनीने केली आहे.
Madhubala Short Film
Madhubala Short Filmesakal
Updated on
Summary

लघुपटाला इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ॲवॉर्ड (Indian International Short Film Festival Award) मिळाले आहे.

कोल्हापूर : नीलअश्‍व स्टुडिओनिर्मित (Neelashwa Studio) व स्वप्नील पाटील दिग्दर्शित ‘मधुबाला’ या लघुपटाची (Madhubala Short Film) विविध चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. लघुपटाचा प्रोमो (Short Film Promo) शनिवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. जागतिक समाजव्यवस्थेत वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या महिला आहेत. याच वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या मधू या स्त्रीचे भावविश्‍व मांडणारा, तसेच अवधूत या कवी मनांच्या लेखकाचे भवताल दाखवणारा हा लघुपट आहे.

लघुपटाची निर्मिती येथील नीलअश्‍व स्टुडिओ या प्रॉडक्शन कंपनीने केली आहे. अभिनेत्री अपर्णा चोथे, अभिनेते विकास पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऋषिकांत राऊत यांचे लेखन शंतनू खांडगे यांचे छायांकन आहे. चंद्रशेखर गुरव यांचे संकलन, शशांक पोवार यांचे संगीत, महेश जाधव यांची रंगभूषा, शाहिस्ता मकानदार यांची वेशभूषा आहे.

Madhubala Short Film
Mother's Day 2024 : ..गोष्ट पाळणाघरात रमलेल्या आईची! मुलीच्या संगोपणासाठी 'तिने' दिला नोकरीचा राजीनामा

अभिनव कुरणे यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून, तर सलीम फरास यांनी साऊंड डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. लघुपटाला इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ॲवॉर्ड (Indian International Short Film Festival Award) मिळाले आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, केरळ शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, चित्रपती व्ही. शांताराम शॉर्टफिल्म फेस्टिव्हल, पुणे शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आदी महोत्सवासाठी लघुपटाची निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.