आण्णाभाऊ साठेंच्या कथेवर आधारित लघुपट 'सुलतान'चा जर्मनीत डंका; २१व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमिअर

आण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित 'सुलतान' या लघुपटाची जुलै महिन्यात जर्मनीत होत असलेल्या २१व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे
short film Sultan based on Annabhau Sathe story has been selected for 21st International Film Festival in Germany
short film Sultan based on Annabhau Sathe story has been selected for 21st International Film Festival in Germany

जातेगाव, ता १४- कांबी-मजरा (ता गेवराई) अविनाश कांबीकर यांनी साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित 'सुलतान' या लघुपटाची जुलै महिन्यात जर्मनीत होत असलेल्या २१व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे. सुलतान लघुपटाचा जागतीक(वर्ल्ड) प्रीमिअर जर्मनीतील स्टुटगार्ट या शहरात पार पडणार आहे. ग्रामीण भागातून गेलेल्या कांबीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सुलतान लघुपटाचा डंका विदेशात वाजणार आहे

गेवराईच्या र. भ. महाविद्यालय येथे शिक्षण घेणारे अविनाश कांबीकर हे कांबी (मजरा) येथील रहिवाशी आहेत. महाविद्यालयीन शिक्षणापासून ते सांस्कृतिक आवड जोपासत आहेत. जाहिराती बनवण्याचा त्यांचा व्यवसाय असल्यामुळे ते पिंपरी चिंचवड (जि.पुणे) येथे वास्तव्यास आहेत. कांबीकर यांनी दिग्दर्शित केलेला सुलतान हा त्यांचा पहिलाच लघुपट असून, जवळपास दीड हजार लघुपटातुन त्यांच्या सुलतान लघुपटाची २१ व्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल २०२४ यासाठी निवड करण्यात आली आहे.

short film Sultan based on Annabhau Sathe story has been selected for 21st International Film Festival in Germany
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्तानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, "फोटोत दिसताय त्याप्रमाणे..."

सुलतान या लघुपटाचे चित्रीकरण बीड जिल्ह्यातील माजलगाव, पात्रुड, श्रृंगारवाडी तसेच बीड शहरात करण्यात आले आहे. लघुपटाचे सहनिर्माता म्हणून विजय क्षीरसागर असून, गेवराई शहरातील रंजीत सराटे हे प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय ख्वाडा फेम अनिल नगरकर, गणेश देशमुख, अनिल कांबळे, संतोष वडगीर, अजय साठे यांच्या ही यात भुमिका आहेत.

दिग्दर्शन केलेल्या सुलतान या लघुपटाची निवड प्रथमच २१ व्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल २०२४ मध्ये निवड झाल्याने मला दिग्दर्शक म्हणून आनंद होत आहे.

- अविनाश कांबीकर, दिग्दर्शक, कांबी मजरा (पिंपरी चिंचवड)

short film Sultan based on Annabhau Sathe story has been selected for 21st International Film Festival in Germany
Animal: "पुरुषावर विश्वास ठेवण्यासारखी दुसरी भयानक गोष्ट नाही"; 'अॅनिमल'बाबत नेटकऱ्याची पोस्ट; रश्मिका म्हणाली,"मूर्ख पुरुषावर..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com