लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकरांचा प्रेरणादायी प्रवास! प्रदर्शनापूर्वीच 36 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या 'गाभ'ची कशी झाली निर्मिती?

लेखक-दिग्दर्शक म्हणून कारकीर्द गाजविण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. ‘गाभ’ हा येत्या २१ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journeyesakal
Updated on
Summary

आता ‘गाभ’ (Gabh Movie) या पूर्ण लांबीच्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या रुपेरी पडद्यावर लेखक-दिग्दर्शक म्हणून कारकीर्द गाजविण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत.

Writer-Director Anup Jatratkar Inspiring Journey : सीमाभागातील निपाणीच्या देवचंद महाविद्यालयात (Devchand College Nipani) शिक्षण घेत असलेल्या अनुप जत्राटकर (Anup Jatratkar) या युवकानं चित्रपट निर्मितीविषयी फारशी काही माहिती नसताना किंवा कोणतीही पार्श्वभूमी नसताना सन २००५ मध्ये आपल्या सहपाठी मित्रांच्या सहकार्यानं ‘शिकार’ नावाचा एक लघुपट (Shikar Short Film) संपूर्णपणे निपाणी परिसरात चित्रित केला आणि त्याचा प्रीमिअर करून तो लोकांसमोर प्रदर्शितही केला.

लघुपट निर्माण करावेत आणि केलेच तर त्यांचे प्रीमिअर शो (Premiere Show) करून लोकांसमोर आणावेत, असा तो कालखंड नव्हता. त्यावेळी सारे शूटिंग, रेकॉर्डिंग हे छोट्या मिनी व्हिडिओ टेपवर केले जात असे. डिजिटल कॅमेऱ्यांचे आगमन अद्याप काही वर्षे दूर असण्याचा तो काळ होता. अशा काळात लघुपटांचे प्रीमिअर करणारा निपाणीच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनुप हा पहिला निर्माता-दिग्दर्शक होता.

लघुपटांनी मिळविली प्रचंड लोकप्रियता आणि पुरस्कार

शिकारनंतर त्यांनी निपाणीमध्ये ‘हॅपी इंडिपेंन्डन्स’ नावाचा काश्मीर समस्येवरील लघुपट बनविला. त्यानंतर आल्फ्रेड हिचकॉकच्या लघुकथेवरील ‘दि कॉन्ट्रॅक्ट’, पाणी समस्येला वाचा फोडणारा ‘डब्ल्यू’, बाप-लेकाच्या नातेसंबंधांवर वेगळ्या अंगाने भाष्य करणारा ‘समर’ असे अनेक लघुपट केले. ‘दि प्रॉमिस’ या स्त्री-भ्रूण हत्येवरील लघुपटाने अनुप यांच्या कारकीर्दीला वेगळे वळण दिले. व्यावसायिक कलाकार, तंत्रज्ञ यांचा या प्रकल्पात समावेश होता. त्याच्या प्रीमिअरला कोल्हापुरात न भूतो… स्वरुपाचा प्रतिसाद लाभला. रसिकांनी हा लघुपट प्रचंड उचलून धरला. महाराष्ट्रासह कर्नाटकात या लघुपटाचे ५००हून अधिक डिमांड शो आयोजित करण्यात आले, हा एक वेगळा विक्रमच होता. यावर शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतून चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात आली.

Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey

देशभरातील अनेक महोत्सवांतून त्याला २५ नामांकने आणि १४ पुरस्कार लाभले. त्यामध्ये नवी दिल्ली येथील दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मिळालेल्या ‘स्पेशल मेन्शन’ पुरस्काराचा समावेश होता. पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर भाष्य करणाऱ्या ‘पंचगंगा: अ जर्नी फ्रॉम संगमा टू संगमा’ या माहितीपटास महाराष्ट्र शासनाचा वसुंधरा पुरस्कार मिळाला. डब्ल्यू, क्षितिज, डॉक्टर... तुम्ही होता म्हणून! हे लघुपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाले. ‘फिशी लाईफ’ या चित्रपटाला बेंगलोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उद्घाटनाच्या लघुपटाचा बहुमान लाभला. मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘अनुप जत्राटकर मल्टिमीडिया प्रोडक्शन’ला बेस्ट इमर्जिंग फिल्म प्रोडक्शन कंपनी म्हणून तर, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट शॉर्ट फिल्म प्रोडक्शन हाऊस इन इंडिया’ म्हणून गौरविण्यात आले.

Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey

लघुपटांमध्ये सिक्वेल करण्याचा पहिला प्रयत्न अनुप यांनीच केला. इपिफनी ऑफ गॅलिलिओ या लघुपटाचा सिक्वेल असलेल्या स्मोकिंग झोन या त्यांच्या लघुपटाने विविध महोत्सवांत १४ नामांकने आणि ८ पुरस्कार मिळविले. लघुपटांसाठी व्यावसायिक प्रायोजकत्व आणि व्यावसायिक पातळीवर विक्री व वितरण होणाराही हा पहिला लघुपट ठरला. लघुपटांना प्रायोगिक आणि हौशी स्तरावरुन पुढे व्यावसायिक पातळीवर घेऊन जाण्याची कामगिरीही अनुप यांच्याच नावावर जमा होते. ‘येस, आय ब्लीड’ या मासिक पाळीच्या संदर्भातील समज-गैरसमजांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या माहितीपटास रायझिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट संकल्पनेसाठीचा पुरस्कार मिळाला.

Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey

महाराष्ट्र शासनाचा विजय तेंडुलकर पुरस्कार विजेते लेखक

लघुपट माहितीपटांच्या निर्मिती-दिग्दर्शनापलिकडे लेखक म्हणून अनुप जत्राटकर यांनी अनेक सन्मान प्राप्त केले आहेत. ‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’ या त्यांच्या पहिल्याच एकांकिका संग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार योजने’अंतर्गत ‘विजय तेंडुलकर पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्याखेरीज विविध एकांकिका लेखन स्पर्धांमध्ये त्यांच्या एकांकिकांना पुरस्कार मिळाले आहेत. राज्य नाट्य स्पर्धांमधून त्यांच्या एकांकिकांचे प्रयोगही झालेले आहेत. वैयक्तिक पातळीवरही त्यांना नांदणी येथील राजर्षी शाहू पुरस्कार, कलाभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पर्वरिम (गोवा) येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ११व्या शेकोटी साहित्य संमेलनाचे उद्घाटक ते होते.

Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey

उज्ज्वल शैक्षणिक कारकीर्द

एकीकडे लघुपट-माहितीपटांच्या क्षेत्रात अशी भरीव कारकीर्द घडवित असताना अनुप यांची शैक्षणिक तसेच व्यावसायिक पातळीवरील वाटचालही युवा पिढीसाठी मार्गदर्शक स्वरुपाची आहे. देवचंद महाविद्यालयातून इंग्रजी विषयातून त्यांनी एम.ए.ची पदव्युत्तर पदवी घेतली आहेच; त्याखेरीज त्यांनी मराठी, हिंदी आणि मानसशास्त्र या तीन विषयांमध्ये पदव्या प्राप्त केल्या आहेत. हिंदी या विषयातील क्रिएटिव्ह रायटिंगची पदव्युत्तर पदविका त्यांनी घेतली असून फिल्म अँड टेलिव्हिजन डिरेक्शनचीही पदव्युत्तर पदविका घेतली आहे.

Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey

शिवाजी विद्यापीठाच्या फिल्म मेकिंग अभ्यासक्रम निर्मितीत मोलाचं योगदान

व्यावसायिक लेखक-दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांनी स्वतःचे अनुप जत्राटकर मल्टीमीडिया प्रोडक्शन हाऊस सुरू केले. ऑडिओ-व्हिज्युअल रेकॉर्डिंग-एडिटिंगसाठी स्वतःचा ‘प्रियदर्शन अटॅलिअर’ हा स्टुडिओ उभारला आहे. शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन अधिविभाग, संजय घोडावत विद्यापीठाच्या मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन अधिविभाग या ठिकाणी ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. याखेरीज चित्रपट निर्मिती, चित्रपट क्षेत्रातील व्यवसाय संधी, चित्रपट कसा पाहावा?, लघुपट व माहितीपट निर्मिती, पटकथा लेखन कौशल्ये आदी विषयांवर त्यांनी देशभरात विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत, अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे सन २०२४-२५पासून शिवाजी विद्यापीठात सुरू होणाऱ्या ‘बी.ए. इन फिल्म मेकिंग’ या पूर्णवेळ पदवी कोर्सच्या अभ्यासक्रम निर्मितीमध्ये त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे.

Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey

लेखन-दिग्दर्शनातील चौफेर कारकीर्द

एकूणच सन २००५ पासून अवघ्या वीस वर्षांच्या कालावधीत ३२ लघुपट व २१ माहितीपटांचे लेखन-दिग्दर्शन, ४८ लघुपट, २३ माहितीपट व २ प्रायोगिक नाटकांचे लेखन, ८ बाह्य माहितीपटांचे दिग्दर्शन, ३ लघुपटांसह एका माहितीपटाची निर्मिती, दोन व्हिडिओ अल्बम आणि दोन ऑडिओ अल्बमसाठी गीतकार, दोन एकांकिकांचे दिग्दर्शन, देव्हारा या व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शन यांसह दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांसाठी पायलट दिग्दर्शक, विविध रेडिओ, टीव्ही, केबल वाहिन्यांसाठी जिंगल्स आणि जाहिरातींचे पटकथा लेखन व दिग्दर्शन, विविध गीतसंग्रह, दिवाळी अंक, दैनिके यांसाठी कथा व कविता लेखन अशी चौफेर कारकीर्द अनुप जत्राटकर यांनी तरुण वयातच घडविली आहे.

Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey
Writer-Director Anup Jatratkar Inspirational Journey

आणि आता ‘गाभ’ (Gabh Movie) या पूर्ण लांबीच्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या रुपेरी पडद्यावर लेखक-दिग्दर्शक म्हणून कारकीर्द गाजविण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. ‘गाभ’ हा येत्या २१ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. शासनाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरित्या निवडला गेलेला हा चित्रपट असून तेथे याचा जागतिक प्रिमिअर सुद्धा झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ३६ राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून प्रदर्शनासह पुरस्कार प्राप्त केले आहेत, ही मोठी अभिमानाची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.