Shraddha Kapoor : स्त्री 2 सुपरहिट होताच श्रद्धा पुन्हा दिसणार फॅन्टसी सिनेमात , क्रिश 4 मध्ये काम करणार असल्याची चर्चा

Shraddha Kapoor gets offer of Krrish 4 : अभिनेत्री श्रद्धा कपूरला क्रिश 4 सिनेमाची ऑफर मिळाली असल्याची चर्चा आहे.
Shraddha Kapoor
Shraddha KapoorEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेता हृतिक रोशनचा क्रिश 4 सिनेमाची चर्चा बराच काळ सुरु आहे. या सिनेमाचं बजेट, कास्ट, व्हीएफएक्स विषयीची बरीच चर्चा पाहायला मिळतेय. या सिनेमाच्या कास्टविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. क्रिश तर हृतिक रोशन साकारणार आहे हे सगळ्यांनाच माहितीये पण यात मुख्य अभिनेत्री कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांमध्येच होती. पण आता अभिनेत्री श्रद्धा कपूरचं नाव आता समोर येतंय.

टाईम्स नाऊने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, श्रद्धाला क्रिश 4मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. श्रद्धाला या सिनेमातही काही सुपरपॉवर मिळण्याची शक्यता आहे. स्त्री 2 मधील श्रद्धाचं काम गाजत आहे. त्यामुळे श्रद्धाला सुपरहिरो म्हणून पाहणं खरंच इंटरेस्टिंग असू शकते. या सुपरहिरो चित्रपटात पाहणे मजेदार असू शकते. त्यामुळे ही जर बातमी खरी असेल तर श्रद्धाला सुपरहीरोच्या भूमिकेत पाहण्यास सगळेचजण उत्सुक असतील हे नक्की.

Shraddha Kapoor
Stree 2 Box Office Day १: 'स्त्री २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मोडला 'गदर २', टायगर ३'चा रेकॉर्ड, वाचा कमाई

'स्त्री 2' ने आतापर्यंत 135 करोडहुन अधिक कमाई केली आहे. सगळेचजण हा सिनेमा एन्जॉय करत आहेत. पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Shraddha Kapoor
Stree 2 Box Office Day 2: 'स्त्री २'चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; दोन दिवसात किती केली कमाई? बजेट वाचून चकीत व्हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.