Marathi Entertainment News : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी लोकप्रिय आहे. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, पन्नाशी उलटून गेल्यानंतरही त्याचा असलेला फिटनेस याविषयी कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळते. पण अक्षय फक्त स्वतःच्याच नाही तर त्याच्या सहकलाकारांच्याही फिटनेसची काळजी घेतो. अभिनेता श्रेयस तळपदेने त्याला हार्टअटॅक आल्यानंतर अक्षयने त्याची काळजी कशी घेतली हे एका मुलाखतीत सांगितलं.