Anant- Radhika Pre Wedding
Anant- Radhika Pre Wedding Esakal

Anant- Radhika Pre Wedding : रिहानानंतर अनंत-राधिकाच्या प्री-वेडींगमध्ये थिरकणार शकिरा ! परफॉर्मन्ससाठी घेते 'इतकं' मानधन

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या इटलीमधील प्री वेडिंगमध्ये शकिरा परफॉर्म करणार असल्याचं म्हंटलं जातंय.
Published on

मुकेश अंबानींचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जुलै महिन्यात शाही विवाहसोहळा पार पडणार आहे पण त्यांच्या विवाहपूर्व समारंभाची चर्चा गेले कित्येक महिने रंगलीये.

फेब्रुवारीमध्ये जामनगरमध्ये पार पडलेल्या आलिशान प्री वेडिंगनंतर आता त्यांचं दुसरं प्री वेडिंग इटलीमध्ये एका शाही क्रूझवर पार पडणार आहे. त्यांच्या या प्री वेडींगला हजेरी लावण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज रवाना झाले आहेत.

 रिहानानंतर 'या' सुप्रसिद्ध गायिकेचा परफॉर्मन्स

२९ मे ते १ जूनपर्यंत दुसरा प्री-वेडिंग सोहळा असून सगळेजण क्रूझमधून इटली ते फ्रांस हा प्रवास करणार आहेत. पहिल्या प्री-वेडिंगमध्ये सुप्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स झाला होता. पण आता अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये जगप्रसिद्ध कोलंबियन गायिका शकिरा परफॉर्म करणार असल्याचं म्हंटल जातंय.

टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला शकीराला आमंत्रित करण्यात आलं असून तिच्या कार्यक्रमासाठी अंबानी कुटूंबाने पुन्हा एकदा मोठी रक्कम मोजल्याचं म्हंटलं जातंय.

शकिराचं मानधन

सूत्रांच्या माहितीनुसार, शकिरा खाजगी कार्यक्रमासाठी  जवळपास १० ते १५ कोटी मानधन घेते. रिहानाने जवळपास ७४ कोटी मानधन घेतलं होतं त्यानुसार, शकिराही तितकंच मानधन घेईल असं म्हंटलं जातंय. भारतात ‘वाका वाका’, ‘हिप्स डोंट लाइ’, ‘व्हेनएवर व्हेनएवर’ या गाण्यांसाठी शकिरा प्रसिद्ध आहे. त्यामुळे अंबानी कुटूंबाच्या प्री वेडींगमध्ये शकिरा 'वाका वाका' गाणार का? असा प्रश्नही सगळ्यांना पडलाय.

दरम्यान, शकिरा व्यतिरिक्त अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला इवांक ट्रम्प, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स सारखी दिग्गज मंडळी हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.

Anant- Radhika Pre Wedding
Anant Radhika Pre Wedding : 'डायमंड बॅग पासून अलिशान कारपर्यत...' अनंत-राधिकाला कुणी काय काय दिले, सगळ्यात महागडं 'गिफ्ट' कुणाचं?

हे सेलिब्रिटीज झाले इटलीसाठी रवाना

 सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर-आलिया भट्ट, क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी, त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा ही मंडळी प्री वेडिंगसाठी इटलीला गेली आहेत. या व्यतिरिक्त आणखी कोण सेलिब्रिटीज हजर असणार याची चर्चा सुरुये. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार तब्बल ८०० पाहुणे या क्रूझवर हजर राहणार असल्याचं म्हंटलं जातंय.

Anant- Radhika Pre Wedding
Anant Ambani Radhika Merchant: कलाकारांपासून नेत्यांपर्यंत.. अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग फंक्शनला आतापर्यंत कोण-कोण पोहोचलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.