Sonakshi Sinha: सोनाक्षीच्या लग्नाला दोन्हीही भाऊ का होते गैरहजर? लव सिन्हा म्हणाला, "एक-दोन दिवस..."

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding: सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश यांनी मात्र सोनाक्षीच्या लग्नाला हजेरी लावली नाही.
सोनाक्षीच्या लग्नाला दोन्हीही भाऊ का होते गैरहजर? लव्ह सिन्हा म्हणाला, "वेळ आली की..."
Sonakshi Sinhasakal

Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल (zaheer iqbal) यांनी 23 जून रोजी रजिस्टर मॅरेज केलं. सोनाक्षी आणि झहीरच्या कुटुंबासोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील या दोघांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. पण सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश यांनी मात्र सोनाक्षीच्या लग्नाला हजेरी लावली नाही. अशातच आता सोनाक्षीच्या लग्नाबाबत लवनं एका मुलाखतीत सांगितलं.

काय म्हणाला लव?

सोनाक्षीच्या लग्नाला हजेरी का लावली नाही? असा प्रश्न एका वेब साइटच्या प्रतिनिधीनं लवला विचारला. या प्रश्नाचं सोनाक्षीनं उत्तर दिलं, "कृपया एक-दोन दिवस द्या. जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकेन. विचारल्याबद्दल धन्यवाद."

सोनाक्षीच्या लग्नाला दोन्हीही भाऊ का होते गैरहजर? लव्ह सिन्हा म्हणाला, "वेळ आली की..."
Sonakshi Sinha: लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना वैतागली सोनाक्षी सिन्हा; काहीही न बोलता केली फक्त एकच गोष्ट

सोनाक्षीने जेव्हा लग्न सोहळ्यात एन्ट्री केली. तेव्हा तिच्या डोक्यावर फुलांची चादर धरण्यात आली होती. ही चादर साकिब सलीम आणि सोनाक्षीच्या इतर मित्रांनी धरली होती, खरंतर ही चादर वधूच्या भावांनी धरली पाहिजे.

सोनाक्षी आणि झहीर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "आजच्याच दिवशी, सात वर्षांपूर्वी (23.06.2017) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले आणि ते प्रेम धरून ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज त्या प्रेमाने आम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि या क्षणापर्यंत नेले आहे. आमच्या कुटुंबांच्या आणि आमच्या देवतांच्या आशीर्वादाने… आता आम्ही पती आणि पत्नी आहोत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com