Entertainment News: कलाकारांचं आयुष्य कायमच धकाधकीचं असतं. शूटिंग, घर, प्रोमोशन्स सांभाळत कलाकार बऱ्याचदा त्यांच्या आवडीलाही तितकंच प्राधान्य देतात. काही कलाकार तर फक्त अभिनयचं नाही तर इतर क्षेत्रातही अव्वल असल्याचं दाखवून दिलंय. या बाबतीत अनेक मराठी कलाकार आघाडीवर आहेत. आपल्या अनेक कलागुणांमुळे प्रसिद्ध असणारी अशीच एक मराठी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (spruha joshi).कवयित्री , लेखिका, गीतकार, अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका म्हणून प्रसिद्ध असणारी स्पृहा सध्या चर्चेत आहे ती तिच्या नवीन छंदामुळे. स्पृहा सध्या विणकाम शिकतेय आणि तिच्या नव्या छंदाची चर्चा सगळीकडेच रंगलीये.
स्पृहा लवकरच कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. एका जोडप्याच्या नात्याची गोड गोष्ट सांगणारी ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. स्पृहाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सेटवरील तिचा संपूर्ण दिवस कसा असतो हे तिने दाखवलं. यावेळी स्पृहा रिकाम्या वेळेत करत असलेल्या लोकरीच्या विणकामाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शूटिंगच्या गडबडीतही आपल्या छंदाकडेही तितकंच लक्ष देत असलेल्या स्पृहाचं अनेकांनी कमेंट्स करत स्पृहाच्या या नवीन छंदाचं कौतुक केलं.
गेल्या काही दिवसांपासून स्पृहा तिचा हा छंद जोपासतेय. क्रोशे पासून तिने बनवलेल्या विविध वस्तू, बाहुल्यांचे फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या कलेचं सध्या खूप कौतुक होतंय.
स्पृहा आणि सागर देशमुख यांची मुख्य भूमिका असलेल्या 'सुख कळले' या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. 22 एप्रिलपासून रात्री 11:30 वाजता ही मालिका कलर्स मराठी या चॅनेलवर प्रसारित होणार आहे. मालती असं स्पृहाच्या भूमिकेचं नाव असून सागर माधव ही भूमिका साकारतोय. संसाराच्या गडबडीत एकमेकांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या या जोडप्याची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच ही जोडी टेलिव्हिजनवर एकत्र काम करतेय.
या आधी स्पृहाने झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेत काम केलं. लोकमान्य टिळकांचा जीवनप्रवास सांगणाऱ्या या मालिकेत तिने लोकमान्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली. मालिकेतील तिच्या अभिनयाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर बऱ्याच काळाने स्पृहा पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.