Akshay Kumar in Stree 2
Akshay Kumar in Stree 2Esakal

Stree 2 : स्त्री 3 नाही तर अक्षय कुमारची मेकर्स बनवणार नवा चित्रपट ? लेखकाच्या खुलास्याने चाहत्यांना बसला धक्का

Stree 2 makers announced new film with Akshay Kumar ? : स्त्री 2 सिनेमा सुपरहिट ठरत असताना या सिनेमातील अक्षय कुमारच्या भूमिकेविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आलीये. एका मुलाखतीमध्ये त्याच्या भूमिकेविषयी सिनेमाच्या लेखकांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
Published on

Bollywood Entertainment News : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला स्त्री 2 हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या सिनेमातील प्रत्येक पात्राने सगळ्यांची मनं जिंकली. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून त्याने अनेक मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत आणि आता चाहते या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत.

अभिनेता अक्षय कुमार या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या भूमिकेबाबत आणि सिनेमाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Loading content, please wait...