Stree2 Trailer Out: 'स्त्रीचं सावट गेलं असलं तरी अजूनही 'त्याचं' अस्तित्व मात्र कायम?'..'स्त्री 2'चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित..

Stree 2 Will be releasing on 15 August 2024: चित्रपटाचा ट्रेलर हा प्रदर्शित झाला असून ५० मिनीटांमध्येच लाखो लोकांनी पाहिला आहे.
stree 2 movie poster
stree 2 movie poster sakal
Updated on

Stree 2 Movie: चित्रपटाच्या ट्रेलर आधी पंकज त्रिपाठी आणि चित्रपट निर्मात्याने 'स्त्री 2' चं पोस्टर बुधवारी इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. पंकज या चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये पुन्हा श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि अपारशक्ती खुराणा यांची केमिस्ट्री पुन्हा दिसणार असून आता पुढची गोष्ट नेमकी काय असेल यावर चाहत्यांची नजर असेल. 'भारतातील सर्वात लोकप्रिय टोळी परत स्त्री सोबत येत आहे, तुम्हाला घाबरवायला आणि हसवायला' असे कॅप्शन देत पंकजने इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर केले आहे.

या पोस्टरमध्ये बिक्की म्हणजेच राजकुमार राव आणि त्याची टोळी हातात फायर स्टीक आणि बॅटरी घेऊन स्त्रीशी सामना करत असल्याचे दिसून येत आहे. यावर इंस्टाग्राम युजरने 'ओ स्त्री कल ट्रेलर लेकर आना', अशी कमेंट केली आहे. यावरून समजते की प्रेक्षकांमध्ये चित्रपटासाठी आतूरता झाली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला, श्रद्धाने इंस्टाग्रामवर ट्रेलर रिलीज होण्याबाबत उत्साह व्यक्त करताना चित्रपटाचे नवीन पोस्टर पोस्ट केले. पोस्टरमध्ये, काळ्या रंगाची एक महिला मागून तिच्या वेणीला धरून उभी आहे, जी काहीतरी गडबड निर्माण करू शकते असं समजत आहे. 'काली तागत से सबकी रक्षा करना वो आ रही है बस दो दिन में' #stree2 trailer out in 2 days, असे म्हणत तीने कॅप्शन दिले होते.

चित्रपटाचा ट्रेलर हा 18 जुलै रोजी प्रदर्शित झाला असून 50 मिनीटांमध्येच लाखो लोकांनी पाहिला आहे. या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय की राजकुमार राव म्हणजेच बिक्की अजूनही श्रद्धा कपूरच्य़ा प्रेमात अडकलेला आहे. आता गावातून जरी स्त्रीचं सावट गेलं असलं तरी अजूनही ज्याने स्त्रीला निर्माण केलं त्याचं मात्र अस्तित्व कायम आहे असं दाखवण्यात आलं आहे. एकूणच ट्रेलरमध्ये दाखवलेल्या नव्या गोष्टी चित्रपटामध्ये कशाप्रकारे पाहायला मिळतील यावर अवलंबून असून हा भागसुद्धा पहिल्या भागासारखा धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे.

स्त्री चा पहिला भाग हा 2028 मध्ये प्रदर्शित झाला होता, तेव्हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला होता. अमर कौशिक यांनी या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, स्त्री2 हा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.