Student Of The Year : 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातील 'हे' गाजलेलं गाणं आहे पाकिस्तानी गाण्याचा रिमेक

Student Of The Year famous song : स्टुडंट ऑफ द इयर या गाजलेल्या बॉलिवूड सिनेमातील गाजलेलं गाणं पाकिस्तानी गाण्याचा रिमेक आहे.
Student of the year
Student of the year Esakal

२०१२ साली रिलीज झालेला करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून अभिनेत्री आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन या कलाकारांनी पदार्पण केलं. अतिशय गाजलेल्या या सिनेमातील सगळीच गाणी सुपरहिट ठरली. पण या सिनेमातील 'डिस्को दिवाने' हे गाणं खूप गाजलं. पण या गाण्यांचाही रंजक इतिहास आहे.

'डिस्को दिवाने' गाण्याचं पाकिस्तानी कनेक्शन

आलिया, वरुण आणि सिद्धार्थ यांच्यावर चित्रित झालेलं 'डिस्को दिवाने' हे गाणं मूळ पाकिस्तानी गाण्यावर आधारित आहे. १९८१ साली पाकिस्तानी जोडी नाझिया आणि झोहेब हसन यांच्या 'डिस्को दिवाने' या गाण्यावर आधारित आहे. गाण्याचे बोल आणि चाल अगदी सारखी आहे. १९८१ मध्ये हे गाणं पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय झालं होतं. सोशल मीडियावर या जुन्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांना या गाण्याचा जुना अंदाजही पसंत पडला. सिनेमासाठी हे गाणं बेनी दयाल आणि सुनिधी चौहान यांनी गायलं होतं.

सिनेमाची कमाई आणि स्टार्सची चर्चा

करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाने १०९ करोड रुपयांची कमाई केली होती. या सिनेमातूनत पदार्पण केलेले आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे त्रिकुट सुपरहिट झालं. या सिनेमातील आलियाचा बिकिनी लूक आणि तिच्यावर चित्रित झालेलं गाणं बरंच चर्चेत राहिलं होतं.

या सिनेमानंतर हे तिघेही स्टार्स बरेच लोकप्रिय झाले आणि आता स्वतः बॉलिवूडमध्ये त्यांनी स्वतःची ओळख कमावली आहे. आलिया बॉलिवूडमध्ये आता एक आघाडीची अभिनेत्री आहे आणि तिने रणबीर कपूरशी लग्न केलं असून त्यांना राहा नावाची मुलगी आहे तर अभिनेता वरुण धवननेंही नताशा दलालशी लग्न केलं असून नुकताच तो एका मुलीचा बाबा झाला तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने अभिनेत्री कियारा अडवाणीशी लग्न केलं.

Student of the year
Varun Dhawan : वरुण धवन झाला बाबा; पत्नी नताशानं दिला मुलीला जन्म

लवकरच स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमावर आधारित वेब सिरीज येणार असून याची निर्मिती करण जोहर करणार आहे. यात अनेक स्टार्स दिसणार असल्याची चर्चा आहे.

Student of the year
Ranbir Kapoor And Alia Bhatt: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खरेदी केली आलिशान कार; किंमत वाचून थक्क व्हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com