Salman Khan: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्या शार्प शूटरला अखेर मुंबईत आणले; जाणून घ्या कोण आहे सुक्खा कालूया?

Who Is Sukha Kaluya: सुक्खा कालूयाला अटक केल्याने सलमान खान प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलीसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
Who Is Sukha Kaluya
Who Is Sukha KaluyaEsakal
Updated on

Sukha Kaluya Sharp Shooter Of Bishnoi Gang:

मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा पानिपतच्या सेक्टर-29 पोलीस स्टेशन परिसरातून लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित एका शार्प शूटरला अटक केली. पानिपत येथून अटक करण्यात आलेल्या शूटरचे नाव सुक्खा असून तो पानिपतच्या रेल कलान गावचा आहे.

अभिनेता सलमान खानला मारण्याची सुपारी घेतल्याप्रकरणी शूटर सुखाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पानिपतच्या सेक्टर 29 पोलीस ठाण्याच्या मदतीने बुधवारी रात्री उशिरा सुखाला अटक केली.

ही अटक नवी मुंबई पोलिसांसाठी मोठे यश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुक्खाविरुद्ध नवी मुंबई पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊसची रेक करणाऱ्या आरोपींमध्ये त्याचा समावेश आहे. या फार्म हाऊसवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, ज्यामध्ये सुक्खा हा मुख्य आरोपी होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.