सुखविंदर सिंग आणि पुण्याचं आहे खास कनेक्शन, म्हणतात- इथे आलो की कधीच गाडीने फिरत नाही कारण...

Sukhwinder Singh: लोकप्रिय गायक सुखविंदर सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपलं पुण्यासोबतच कनेक्शन सांगितलं आहे.
sukhwinder singh
sukhwinder singhesakal
Updated on

गायक सुखविंदर सिंगने आतापर्यंत अनेक गाणी गायलेली आहेत. दिल से या चित्रपटातील छैया छैया या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. आता नुकतेच ते अमेरिका-कॅनडाचा दौरा करून परतले आहेत. आता त्यां त्यांच्या गाण्याची सुरेख मैफल पुण्यामध्ये रंगणार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद..

आतापर्यंत तुम्ही अनेक गाणी गायलेली आहेत. पण सध्या पाहिले तर दर पाचेक वर्षांनी गाण्याचा ट्रेण्ड बदलत चाललेला आहे. या बदलत्या ट्रेण्डबद्दल तुम्ही काय सांगाल..

- ट्रेंड नाही तर गाण्यांचे साउंड बदलत आहेत. जसं की ए. आर. रेहमान यांनी मला घेऊन छैया छैया गाणं तयार केलं. हे गाणे त्यांनी त्यांच्या स्टाईलनेच बनविलं. पण ते बनविताना त्यांनी साऊंड बदलला. तर ट्रेंड बदलणं म्हणजे साउंड बदलणं होय. साउंड जरी बदलला असला तरी गाण्यातील आत्मीयता अजूनही तीच आहे. त्यातच आजकाल प्रत्येकाला गाणी गावीशी वाटतात. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त गर्दी झाली आहे. पण या गर्दीतही काहींकडे ती कला आहे आणि त्याच कलेला मी पकडतो. नव्या साउंडमध्ये मी गातो. पण त्या गाण्याचा गोडवा कधीच मारून टाकत नाही. म्हणून मला असं वाटतं की मी आजही याच गोष्टीमुळे पुढे चाललो आहे. ज्या काही गोष्टी येत आहेत त्या सगळ्याच वाईट नाहीत. काही चांगल्या गोष्टी देखील आहेत.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तुम्ही गाणी गात आहात. छैया छैया या गाण्यामुळे तुम्हाला लोकप्रियता मिळाली. आजही तुम्ही तुमचे स्टारडम टिकवून आहात. हे तुम्हाला कसे काय जमले...

- खरं सांगायचं तर इंडस्ट्रीमध्ये ३० टक्के तुमची गायकी आणि ७० टक्के तुमचा व्यवहार कामाला येतो. जर तुमचा व्यवहार चांगला नसेल तर तुम्हाला कुणीच काम देणार नाही, जरी तुम्ही तानसेन असलात तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे काम करायचं असल्यास मेहनत खूप करावी लागते. तुम्हाला दररोज रियाज करावा लागतो. मी नवनवीन संगीतकारांसोबत काम करून नवीन ट्रेंडला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. फक्त एकच गोष्ट आहे की मी सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव नाही. त्याचं कारण म्हणजे मला सकाळी उठून माझे किती फॉलोवर्स आहेत, किती व्ह्यूज मिळाले याचं टेन्शन नसतं. त्यामुळे मी देवाचं नाव घेऊन माझी सकाळ होते. याचा अर्थ असा नाही की मला बाहेर फिरायला आवडत नाही. मी बाहेर फिरतो, वडापाव, पावभाजी वगैरे खातो, मित्रांना भेटतो. पण रियाज किंवा कामाच्या वेळी मी नेहमी वेळेवर पोहोचतो. या क्षेत्रामध्ये शिस्त असणं खूप महत्त्वाचं आहे आणि शिस्त असली तर व्यवहार आपणहून येतो.

तुमचे चाहते जगभरात आहेत. तुम्ही नुकतेच परदेशामध्ये स्टेज शो केले. त्याबाबत तुम्ही काय सांगाल..

- माझा ३३ दिवसांचा अमेरिका- कॅनडा असा दौरा होता. त्या दौऱ्यामध्ये मी विविध गाणी सादर केली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दिवाळीसाठी मी माझ्या मुंबईतील घरी आलो आहे. आता येत्या नऊ तारखेला पुण्यामध्ये माझा कार्यक्रम होत आहे आणि आता तीच ऊर्जा मी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये देखील लावणार आहे. पुण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचं नाव काढलं की माझे विद्यार्थी जीवन मला आठवते. काऱण पुणे हे कलेचे आणि शिक्षणाचे माहेरघर आहे.

तेथे तुम्ही मराठी गाणी गाणार आहात का..?

- नक्कीच मी आठ ते दहा मराठी गाणी गाणार आहे. त्यामध्ये मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातील "ओ राजे" हे गाणं असणारच आहे. त्याशिवाय अन्य गाण्याचा विचार करीत आहे. त्याबरोबरच माझं नुकतंच "धर्म: द एआय स्टोरी" या चित्रपटातील मराठी गाणं मी रेकॉर्ड केलं आहे. या गाण्याचं संगीत हितेश मोडक यांनी दिलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं लोकगीत आणि शास्त्रीय गीतांचे मिश्रण आहे. हे गाणे सादर कऱणार आहे.

तुम्हाला पुण्यातील कोणकोणत्या गोष्टी आवडतात?

- मी पुण्यात कधीच गाडीतून प्रवास करत नाही. पुण्यात गेलो की वेगवेगळ्या गल्लीतून फिरत, चाट, पाणीपुरी, वडापाव वगैरे खातो. मी पुण्यात बंद गाडीचा प्रवास नाही करू शकत. तिथलं वातावरण मला खूप आवडतं. तिथे शो केल्यानंतर मी एक दिवस तरी राहतोच. कारण तिथे माझे खूप जवळचे मित्र राहतात. त्यांच्या सोबत मी फिरायला जातो, चित्रपट पाहतो, डिनर करतो. तिथे आमचा ३५ लोकांचा ग्रुप आहे. मला कधी कधी असं वाटतं की माझं पुण्यात देखील एक घर असावं. फक्त एकच सांगतो की पुण्यात लोकांचं मनोरंजन खूप होणार आहे. ९ तारखेला तुम्हाला तीच मजा दिसेल.

sukhwinder singh
मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()