Supriya Pathare: धुणीभांड्याची कामं करून शिक्षण आणि पहिल्या नाटकाची कमाई, स्ट्रगल सांगताना सुप्रिया पाठारे भावूक

Supriya Pathare: नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया पाठारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
स्ट्रगल सांगताना सुप्रिया पाठारे भावूक
Supriya Pathareesakal
Updated on

Supriya Pathare: विनोदी भूमिकांसोबत गंभीर भूमिकांसाठीही प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे (Supriya Pathare). नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत सुप्रिया यांनी स्वतःची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीत तयार केली आहे. पण या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सुप्रिया यांनी खूप स्ट्रगल केला आहे. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना सुप्रिया भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, "माझं बालपण खूप कष्टाचं होतं. मी जन्माला आले तेव्हा खूप श्रीमंत कुटूंबात जन्माला आले. माझ्या आजोबांचा कारखाना होता. माझी आजी त्यावेळी नऊवारी नेसून डर्बी खेळायची. पण नंतर काही गोष्टी घडल्या आणि आम्ही गरीब झालो. सगळं ऐश्वर्य गेलं आणि खूप हलाखीची परिस्थिती आली. मी शाळेत होते तेव्हा आमच्या शाळेत पद्धत होती कि प्रत्येक शिक्षिकेने दोन-तीन मुलांना दत्तक घ्यायचं म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी करायचा. मला माझ्या मुख्याध्यापकांनी दत्तक घेतलं होतं. माझी आई कधीच शिकू शकली नाही त्यामुळे तिने आम्हाला शिकायला प्रोत्साहन दिलं. तिने तिचा संसार उत्तम पेलला. लोक गरिबीतून श्रीमंतीकडे जातात ना त्याचा त्रास नाही होत पण श्रीमंतीतून गरिबीत येतात ना तेव्हा त्याचा त्रास होतो. आमच्या बाबांचं सगळं ऐश्वर्य गेल्यानंतर आईने कंबर कसून काम केलं. माझी आई अठरा घरची मालिशची कामं करायची. गरोदर बायकांना मालिश करतात ते काम ती करायची. आणि अजून १८-२० घरची ती धुणीभांड्याची कामं करायची. मी मोठी असल्यामुळे मी आईला या कामांमध्ये मदत करायचे कारण माझी दोन्ही भावंडं खूप लहान होती. त्यावेळी कडक पाव मिळायचे. तर आई दोन कडक पाव आणायची ते आम्ही चार जणं वाटून खायचो. जेव्हा परिस्थिती थोडी सुधारली तेव्हा तिने आमचे खाण्याचे तिने कधी हाल केले नाहीत. पण कपड्यांची हौस कधी आमची ती पुरवू शकली नाही. मला कधीच या क्षेत्रात काम करायचं नव्हतं मला इन्स्पेक्टर वगैरे बनायचं होतं पण परिस्थितीमुळे शिक्षणाचं सगळं बारगळलं. नववी पासूनच मी अभिनयक्षेत्रात काम करू लागले." हा स्ट्रगल पुढे सांगताना त्या म्हणाल्या,"मी दहावीत असताना मला टायफॉईड आणि डबल न्यूमोनिया झाला आणि त्याचवेळी माझे बोर्डाचे पेपर्स होते.माझ्या शाळेतल्या मैत्रिणीने मला मदत केली. मला दिसत नसतानाही मी ते कसेतरी पेपर्स लिहिले. त्यावेळी मला ४७ टक्के मिळाले आणि मी पास झाले. तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या आईने मला १०० रुपये बक्षीस म्हणून दिले." तर नृत्य शिकण्यासाठी सुप्रिया यांनी मैत्रिणीकडे भांडी घासायचं काम केलं होतं आणि त्या पैशातून त्या डान्स क्लासला जात असल्याची आठवण त्यांनी या मुलाखतीत सांगितली.

स्ट्रगल सांगताना सुप्रिया पाठारे भावूक
Supriya Pathare: दीड महिन्याच्या बाळाला घरात ठेवून मी.. सुप्रिया पाठारेंनी सांगितला 'तो' प्रसंग..

तर नाटकातल्या प्रवासाविषयी सांगताना त्या म्हणाल्या,"मी पहिलं नाटक केलं तेव्हा मला दीडशे रुपये मिळाले. ते बघून मी खुश झाले. आईला मात्र नाटकात काम करणं फार्स आवडायचं नाही पण माझ्या बाबांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळेच माझा हा प्रवास सुरु झाला. "

सुप्रिया आता 'नाच गं घुमा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या सिनेमाचा टीझर, गाणी सोशल मीडियावर गाजत आहेत. १ मे २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार असून अभिनेत्री मुक्त बर्वे, नम्रता संभेराव यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.