Irrfan Khan : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते इरफान खान यांच्या निधनाला २९ एप्रिलला चार वर्षं पूर्ण झाली. कॅन्सरशी लढा देताना सगळ्यांचा हा लाडका कलाकार जग सोडून गेला. इरफान यांची पत्नी सुतापा यांनी नुकतीच सोशल मीडियावर इरफान यांच्या आठवणीत एक खास पोस्ट शेअर केली. सोबतच त्यांनी त्या दोघांचा एक जुना फोटो शेअर केला.
पोस्ट मध्ये त्या म्हणतात, "इरफान माझ्या आयुष्यातून गेला या घटनेला चार वर्षं आणि तीन दिवस झाले आहेत. चार वर्षं? अजूनही मला या गोष्टीचा पश्चाताप होतो. आम्ही चार वर्षं त्याच्याशिवाय दुःख, भीती, नैराश्य आणि असहाय्य अवस्थेत काढली. आणि नंतर माझ्या लक्षात आलं कि माझ्या आयुष्यातील सगळ्यात जास्त काळ त्याच्यासोबत घालवला आहे. मी त्याला १९८४ पासून ओळखते म्हणजे जवळपास ३६ वर्षं मी त्याला जास्त ओळखत होते. याचा अर्थ मी जेव्हा मरेन तेव्हा मी त्याच्यासोबत घालवलेला काळ हा मी त्याच्याविना घालवलेल्या काळापेक्षा नक्कीच जास्त असेल."
या पोस्टमध्ये त्यांनी दिलजीत सिंह आणि परिणीती चोप्रा यांचा सध्या गाजत असलेल्या सिनेमाचंही कौतुक केलं आणि इरफानला या सिनेमाविषयी काय वाटलं असतं तेही त्यांनी लिहिलं. त्या म्हणाल्या," मी विचार केला तो जर आता असता तर आम्ही कशावर चर्चा केली असती. कारण सगळ्यात जास्त मी तेच मिस करते. तो २०२४ मध्ये शूटवरून थेट घरी आला असता आणि आमच्या मांजराचे लाड करत करत पुस्तक वाचत असता.
मी: तू चमकीला पाहिलास का?
त्याने लगेच माझ्याकडे पाहिलं नसतं . (वाचत असताना तो असं कधीच करायचा नाही.)
मी: त्याने खूप मस्त काम केलं. मला त्याचा अभिनय आवडला.
तो: अच्छा.. कोण?
मी: अरे यार दिलजीत दोसांज..तो खूप ठरवलेला अभिनय करत नाही आणि मनापासून करतो.. तो मला आठवण करून देतो..
तो : (आता माझ्याकडे बघत) अच्छा... तुला खरंच वाटत तो इतका चांगला आहे.
मी: हो. तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं पाहिजे. ते खूपच भारी असेल. किस्सा सिनेमानंतर तू पुन्हा सरदारची भूमिका साकारशील आणि दोन भावांची कथा...
तो: हम्म (त्याचा फोन वाजला) ए दिनू (दिनेश विजयन) यार ही सुतापा म्हणतेय दिलजीत दोसांज खूप चांगला आहे.
मी: चांगला नाही खूप चांगला
तो: हो यार नक्कीच काहीतरी करूया... पंजाबी सुफी कवींवर काहीतरी. मी आज चमकीला बघतो
किंवा
OR
तो घरी येताना त्याच्या हेडफोन्सवर गाणी ऐकतोय आणि मला म्हणतो,"अरे यार सुतपु इर्शादने काय लिहिलंय (त्याला इर्शाद कामिल खूप आवडायचा) उफ्फ खतरनाक... तू विदा करो हे गाणं ऐकलंयस का? काय गाणं आहे." तो आणि त्याचा मॅनेजर मनप्रीत एकमेकांशी बोलतायत आणि तो मनप्रीतला सांगतोय "मला एक मल्याळी सिनेमा करायचाय. फहाद फाझील ज्या सिनेमात काम करतोय त्या दिग्दर्शकासोबत मला काम करायचंय. अरे यार मी त्याचं नाव विसरली. मी तुला सांगतो जर बॉलिवूडने त्याची वाट बदलली नाही तर मी नक्कीच मल्याळी सिनेमांमध्ये काम करेन."
हेच आम्ही २०२४ मध्ये बोललो असतो. "
सुतापा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असून दिलजीत दोसांजने कमेंट करत इरफान यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सुतापा यांचे आभार मानले. तर अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत इरफान यांच्या आठवणी ताज्या केल्या आणि सुतापा यांच्या पोस्टचं कौतुक केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.