Ramanand Sagar's Ramayan Serial : अभिनेता स्वप्नील जोशीने बालकलाकार म्ह्णून अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्याने मराठी इंडस्ट्रीत आघाडीचा कलाकार म्हणून ओळख बनवली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वप्नील जोशीने रामायण आणि श्रीकृष्ण मालिकेच्या आठवणी शेअर केल्या.
व्हायफ़ळ गप्पा या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वप्नीलने रामानंद सागर यांच्या अनेक आठवणी शेअर केल्या. तो म्हणाला कि,"मी एक व्यावसायिक नाटक केलं आणि नंतर लगेच मला उत्तर रामायण मध्ये कुशची भूमिका मिळाली. मी तेव्हा नऊ-दहा वर्षाचा होतो. आमच्या सेटवरच वातावरण खूप सुंदर होतं. रामानंद सागर मला तेव्हा सांगायचे तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी देवाने दिलीये या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची. त्यांचं ते वाक्य मला आता कळतंय. आमच्या सेटवर प्रत्येकाला सांभाळून घेतलं जायचं. प्रत्येक कलाकाराने आम्हाला सांभाळून घेतलं. सेटवर रामानंद सागर यांचे जेवण बनवणारे महाराज आमच्यासाठी खास संध्याकाळी वेगळं जेवण बनवायचे. तर रात्री रामानंद सागर आम्हाला खोलीत बोलवायचे आणि उद्या शूट करत असलेला सीन गोष्टीच्या रूपात समजवायचे त्यामुळे इतक्या लहान वयात ती भूमिका साकारणं मला सोपं गेलं. "
रामानंद सागर कलाकारांची कशी काळजी घ्यायचे याची आठवण सांगताना स्वप्नील म्हणाला कि,"माझ्या अभ्यासाविषयी मालिकेचे निर्मातेही खूप जागरूक होते. लवची भूमिका साकारणारा कलाकार आणि माझ्या परीक्षांचं वेळापत्रक बघून शूटिंग केलं जायचं. एकदा माझी परीक्षा होती आणि माझा अभ्यास झाला नव्हता. मी खूप टेन्शनमध्ये होतो, रडत होतो. रामानंद सागर यांना ही गोष्ट कुणीतरी जाऊन सांगितली. ते माझ्या खोलीत झाली आणि विचारलं काय झालं ? तेव्हा मी त्यांना अभ्यास झाला नसल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला लगेच सांगितलं कि, उद्या आपण शूटिंग बंद ठेवू. तू दिवसभर अभ्यास कर आपण नंतर शूटिंग करू. एका बालकलाकारासाठी त्यांनी हे करणं ही खूप मोठी गोष्ट आहे."
स्वप्नीलने रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालिकेत साकारलेली श्रीकृष्णाच्या राधापर्व भूमिका सगळ्यांना आवडली होती. त्यामुळे त्याला खूप प्रसिद्धीही मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.