Bai Ga Box Office Collection : स्वप्नीलच्या 'बाई गं' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी ; पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' लाख

Swwapnil Joshi's Bai Ga Box Office Collection : अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या 'बाई गं' सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती पैसे कमावले जाणून घेऊया.
Bai Ga Box Office Collection
Bai Ga Box Office CollectionEsakal
Updated on

Bai Ga Movie : सध्या स्त्री प्रधान सिनेमांचं ट्रेंड सुरु आहे. मल्टिपल अभिनेत्री असलेले सिनेमे सध्या थिएटर्समध्ये रिलीज होत आहेत. स्वप्नील जोशी आणि सहा अभिनेत्रींची मुख्य भूमिका असलेला बाई गं सिनेमा काल १२ जुलैला रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली ही आकडेवारी समोर आली आहे.

स्वप्नील जोशी, सागर कारंडे आणि सहा अभिनेत्रींची बाई गं या सिनेमात मुख्य भूमिका आहे. यशस्वी पुरुषामागे बाई असते असं म्हंटल जातं पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायकां असतील तर त्या पुरुषाची स्थिती काय असेल? यावर हा सिनेमा आधारित आहे. आताचा संसार सुखी होण्यासाठी पूर्वीच्या पाच जन्मातील बायकांची स्वप्न पूर्ण करण्याचा टास्क या सिनेमात स्वप्नीलला मिळाला आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि टीझरने प्रेक्षकांचं मन जिंकलं असलं तरीही रिलीज झाल्यावर या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे.

सॅकनिल्क या वेबसाईटने शेअर केलेल्या बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार या सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त आठ लाख रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी सिनेमाने फक्त इतकी कमी ओपनिंग केल्यामुळे चाहत्यांमध्ये निराशाजनक वातावरण आहे. त्यामुळे वीकेंडला हा सिनेमा उत्तम काम करेल अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे.

आगामी कास्ट

या सिनेमाची कास्ट मल्टीस्टारर आहे. या सिनेमात स्वप्नील आणि सागर बरोबर सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. मितवा सिनेमानंतर बऱ्याच काळाने स्वप्नील आणि प्रार्थना एकत्र काम करत आहेत. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलं असून या सिनेमाची पटकथा आणि संवादसुद्धा त्यांनी केलं आहे. संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर केलं आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Bai Ga Box Office Collection
Bai Ga: गेल्या 5 जन्मांच्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का? 'बाई गं' चा भन्नाट टीझर रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com