Swargandharva Sudhir Phadke Review : सुधीर फडकेंच्या संघर्षाची सांगितीक गाथा

Swargandharva Sudhir Phadke Review : संघर्षातून अनेक अडथळे,अडचणींवर मात करत संगीतकार, गीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके घडले. सुधीर फडकेंची हीच गाथा आपल्याला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) या चित्रपटात पाहायला मिळतेय.
सुधीर फडकेंच्या संघर्षाची सांगितीक गाथा
Swargandharva Sudhir Phadke Review esakal
Updated on

Swargandharva Sudhir Phadke Review: लोकप्रियता आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधी संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. अशाच संघर्षातून अनेक अडथळे, अडचणींवर मात करत संगीतकार, गीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडकेही घडले. आपली स्वप्नं आणि ध्येय हे कायम उराशी बाळगून ते संघर्ष करत राहिले. अनेकदा ते खचलेही मात्र त्यांचं ध्येय त्यांना सतत पुढे जात राहण्याची प्रेरणा देत राहिलं. सुधीर फडकेंची हीच गाथा आपल्याला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) या चित्रपटात पाहायला मिळतेय.

अगदी लहानपणापासून त्यांना मिळालेली आई-वडिलांची माया, नंतर तरुण वयात एकट्याने केलेला संघर्ष, मित्रांची साथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणं ते लोकप्रियता आणि यशाची शिखरं गाठण्याचा त्यांचा काळ या चित्रपटात पाहायला मिळतो. त्यांच्या जीवप्रवासात त्यांना अनेक महान व्यक्ती आणि दिग्गजांची साथ देखील मिळाली आणि त्यांच्या सहवास लाभला, यातूनही फडके कसे घडले हे पाहणं महत्त्वाचय. तर सुधीर फडकेंची अनेक गाजलेली सुरेल अर्थपूर्ण गाणी, संगीत या चित्रपटातील विविध वळणावर ऐकायला मिळतात जी या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्या गाण्यांमधील शब्दांना साजेशी अशी कथेतील विविध वळणं सादर होताना दिसतात. ती गाणी फडकेंच्या आयुष्याशी कशी मिळती जुळती आहेत याची उत्तम सांगड घालण्यात आलीय. सुप्रसिद्ध कविश्रेष्ठ ग दी माडगूळकर यांच्यासोबतची फडकेंची मैत्री किंवा त्यांना लाभलेला स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर यांचा सहवास यागोष्टीदेखील अधोरेखित होतात.

शांत, संयमी आणि संगीत विश्वात हरवलेल्या सुधीर फडकेंचं व्यक्तिमत्व अभिनेते सुनील बर्वे यांनी उत्तम सादर केलय. हे पात्र ते रुपेरी पडद्यावर जिवंत करतात. तर तरुण वयातील फडकेंची भूमिका साकारलीय अभिनेता आदिष वैद्यने. आदिषने फडकेंच्या तरुण वयातील संघर्षाचा काळ सादर केलाय. आदिषने त्यांचं उत्तमोत्तम काम या चित्रपटातून समोर आणलय. बाबुजींच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री् मृण्मयी देशपांडेही सुंदर काम करताना दिसते. मृण्मयीच्या अभिनयातील सहजता या पात्राला न्याय देते. ग. दी. माडगुळकर यांची भूमिकाही उत्तम सादर झालीय. अभिनेते सागर तळाशीकर यांनी ही भूमिका साकारलीय. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय. योगेश यांच्या दिग्दर्शनात झालेल्या सादरीकरण आणि मांडणीतील वेगळेपण आणि नाविन्य प्रयोग कलात्मक आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांनी लिहीली आहेत.तर याशिवाय आशा भोसले यांच्या भूमिकेत अपूर्वा मोडक, माणिक वर्मांच्या भूमिकेत सुखदा खांडकेकर, राजा परांजपेंच्या भूमिकेत मिलिंद फाटक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत धीरज जोशी, बालवयातील सुधीर फडकेंच्या म्हणजेच रामच्या भूमिकेत बालकलाकार विहना शेडगे, फडकेंच्या आईच्या भूमिकेत विभावरी देशपांडे, पाध्ये बुवांच्या भूमिकेत नितीन दंडुकसे, डॉ. अशोक रानडेंच्या भूमिकेत परितोष प्रधान, साहेबमामा फतेहलाल यांच्या भूमिकेत अविनाश नारकर, डॉ हेडगेवार यांच्या भूमिकेत शरद पोंक्षे, न. ना. देशपांडे यांच्या भूमिकेत उदय सबनीस, महम्मद रफी यांच्या भूमिकेत निखिल राऊत, श्रीधर फडकेंच्या भूमिकेत निखिल राजे शिर्के हे कलाकार पाहायला मिळतात.

सुधीर फडकेंच्या संघर्षाची सांगितीक गाथा
Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड
सुधीर फडकेंच्या संघर्षाची सांगितीक गाथा
Swargandharva Sudhir Phadkeesakal

हा चित्रपट एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव देतो, त्यासाठी छायांकन आणि संकलनाची वाजू पक्की असल्याचं जाणवत. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि वेशभुषा, पेहराव, मेकअप यागोष्टीही तो काळ पडद्यावर जिवंत करतात.या चित्रपटात काही त्रुटी देखील जाणवतात. चित्रपटातील संवाद काही महत्त्वाच्या ठिकाणी तितके प्रभावी वाटत नाहीत. चित्रपटाची सुरुवात धिम्या गतीने सुरु होते, सुरुवातीची काही मिनेटे खिळवून ठेवण्यात अयशस्वी ठरतात.सुधीर फडकेंची गाणी आजही तितकीच श्रवणीय आणि प्रत्येक काळाशी जुळणारी आहेत. त्यामुळे ज्यांना या गाण्यांचा आस्वात घेता आलेला नाहीय त्यांनाही या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची सुरेल गाणी ऐकता येतील. संघर्षाच्या काळात खचून न जाता संयम आणि सातत्य आपल्या ध्येय गाठण्यात मदतशील ठरतं हे देखील या चित्रपटातून घेण्यासारखं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.