T20 World Cup: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup) साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवली आहे. बीसीसीआयनं टीमची घोषणा केल्यानंतर काही लोक आनंदी झाले, तर काही लोक नाराज झाले आहेत. अशातच आता अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) देखील नाराजी व्यक्त केली आहे. रितेशने एक ट्विट (X) शेअर करून केएल राहुलला टीममध्ये न घेतल्यानं नाराजी व्यक्त केली. पण आता नेटकऱ्यांनी मात्र रितेशची चांगलीच शाळा घेतली.
रितेशनं ट्विटमध्ये लिहिलं, "T20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये केएल राहुलला घ्यायला हवं होतं." रितेशच्या या ट्विटवर कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
रितेशनं शेअर केलेल्या ट्विटला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "बॉलिवूडमधील लोक केएल राहुलचा बराच विचार करत आहेत."तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "त्याने बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न केले म्हणून का? जागा हो भाऊ, त्याचा 19 नोव्हेंबरचा गेम तू विसरलास का?"
बीसीसीआयने रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, हार्दिक पंड्य, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव या खेळाडूंची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड केली आहे. तसेच जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन आणि मोहम्मद सिराज यांना देखील संघात ठेवण्यात आले आहे. शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांची राखीव म्हणून निवड करण्यात आली आहे.
क्या कूल है हम,मालामाल विकली, हे बेबी, धमाल, हाऊसफुल्ल, डबल धमाल, तेरे नाल लव्ह हो गया, हाऊसफुल्ल 2, ग्रँड मस्ती या चित्रपटांमधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच त्याच्या वेड या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रितेशचा ’राजा शिवाजी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.