चूक कोणाची? 'ठरलं तर मग'च्या सहाय्यक दिग्दर्शकाचा मोठा अपघात; आठ दिवस आहे कोमात, जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

Tharla Tar mag Assistant Director Accident: लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'च्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाला आहे. याबद्दल जुईने पोस्ट केली आहे.
jui gadkari
jui gadkarisakal

Jui Gadkari: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. गेली वर्षभर ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या स्थानावर आहे. मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी हिनेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. जुई सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांशी जोडलेली असते. मात्र तिने आता एका पोस्टमधून चाहत्यांसोबत एक धक्कादायक बातमी शेअर केली आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला आहे.

जुईने फेसबुक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तिने ही पोस्ट करत रस्त्याचं मनोगतही लिहिलं आहे. पोस्ट करत जुई म्हणाली, 'अगदी काल परवा पर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरच होतं ना… मला वर्षानु वर्ष त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा… पण निदान त्या मुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा… घरी ऊशीरा जात असाल पण सुखरुप पोहचत होता! मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची??? माझी वाट बघणारं घरी कोणी नाही… पण तुमची वाट बघणारे आहेत… काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा… पावसाळा येतोय… पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्किड होतात.. तर स्वताःची आणि इतरांची पण काळजी घ्या.' -तुमचाच (लाडका) रस्ता'

तिने पुढे लिहिलं, 'गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघुन डोकं सुन्नं झालंय… त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे… तो गेले ७-८ दिवस कोमात आहे.. प्लिज गाड्या हळु चालवा.' ही पोस्ट करत तिने चाहत्यांना गाड्या जपून चालवण्याचं आवाहन केलं आहे. तिच्या पोस्टवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. सोबतच सहाय्यक दिग्दर्शक बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

jui gadkari
थेट ६ महिने पुढे का ढकलली 'पुष्पा २' ची रिलीज डेट? वाचा कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com