Actor Darshan in Jail: कन्नड सुपरस्टार दर्शनला तुरुंगात शाही पाहुणचार, सात अधिकारी निलंबित
बंगळूर, ता. २६ : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खूनप्रकरणी तुरुंगात असलेला अभिनेता दर्शन याला शाही वगणूक देण्यात येत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर परप्पन अग्रहाराच्या सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
पत्रकारांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री परमेश्वर म्हणाले की, राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सीसीटीव्ही आणि जॅमर लावले आहेत. मात्र, अशा घटना घडल्यास अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे. अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. तुरुंगातील दर्शनला पाहुणचारप्रकरणी सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच घटनेचा अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई करू. यामध्ये कोणतीही गय केली जाणार नाही.या प्रकरणात वरिष्ठांचा थेट सहभाग असेल तर त्यांनाही निलंबित केले जाईल.’’
कारागृहात यापूर्वीच जॅमर लावला आहे. तथापि, त्याची वारंवारता जास्त असल्यास त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होतो. त्यासाठी आम्ही वारंवारता कमी केली आहे. चहा पिताना आणि सिगारेट ओढताना दर्शनाचा फोटो कोणी काढला? कारागृहात मोबाईल कसा आला? ज्या मोबाईलवर फोटो काढला, त्याची चौकशी करू, असेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्या कारागृहात हलविणार?
आपल्यावर कोणताही दबाव नाही. मात्र दर्शन आणि टोळीतील सदस्यांना दुसऱ्या कारागृहात हलविण्याचा विचार सुरू असल्याचेही परमेश्वर यांनी सांगितले.
अभिनेता दर्शनला विशेष वागणूक दिल्याच्या आरोपप्रकरणी सात जणांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. तसेच कारागृहाच मुख्य अधीक्षक, अधीक्षक यांनाही सोमवारी निलंबित केले आहे. ही अधिकारी हलगर्जी असून या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई केली जाईल.
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.