Twinkle Khanna: "कल और आज कल"; ट्विंकल खन्नाने बॉबी देओल सोबतच्या आठवणींना दिला उजाळा

Bobby Deol: नुकतच ट्विंकलने (Twinkle Khanna) सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये ट्विंकलने अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सोबतचे जुने फोटो आणि नुकताच काढलेला सेल्फी देखील शेयर केलाय.
 "कल और आज कल"; ट्विंकल खन्नाने बॉबी देओल सोबतच्या आठवणींना दिला उजाळा
Twinkle Khannasakal

Twinkle Khanna: अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही कायमच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त बोलण्यामुळे चर्चेत असते. सध्या ट्विंकल खन्ना ही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मिडीयावरही ट्विंकल मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतच ट्विंकलने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये ट्विंकलने अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सोबतचे जुने फोटो आणि नुकताच काढलेला सेल्फी देखील शेयर केलाय. ही पोस्ट शेयर करत ट्विंकलने बॉबीसोबतची जुनी आठवण शेयर केली आहे.

'बरसात' या चित्रपटात ट्विंकल आणि बॉबी देओल एकत्र झळकले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री लोकप्रिय ठरली होती. या पोस्टमध्ये ट्विंकल लिहीते की, "कल और आज कल, फक्त पिंकी मावशीच बॉबी देओलची चाहती नाही. मी पण त्याला चांगलं काम करताना पाहुन प्रभावित झालीय. जुन्या आठवणी गोडी असतात, पुन्हा एकदा एकमेकांना आधीसारखं भेटून छान वाटलं." नुकतीच ट्विंकल आणि बॉबी देओल यांची भेट झाली होती. यावेळी दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. या पोस्टमधून दोघांची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचं पाहायला मिळतय. अनेक वर्षांनी भेट झाल्यामुळे ट्विंकलने आपल्या मित्राच्या कामाचं कौतुकही केलय. शिवाय 'बरसात' या चित्रपटाचे फोटोही सोबत शेयर केले आहेत.

1995 साली 'बरसात' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून ट्विंकल खन्नाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं असून बॉबी देओल हा तिचा पहिला सह कलाकार होता. शिवाय बॉबी देओलनेही याच चित्रपटातून सिनेसृष्टीत पदापर्ण केलं होतं. दोघांसाठी हा चित्रपट खास असल्याने दोघांची अनेक वर्षांची खास मैत्री आहे.

 "कल और आज कल"; ट्विंकल खन्नाने बॉबी देओल सोबतच्या आठवणींना दिला उजाळा
Twinkle Khanna: स्त्री पुरुष समानता म्हणजे डबल काम आणि...! 'फेमिनिझम' वर अक्षयची पत्नी ट्विंकल काय बोलून गेली?

संदीप वांगा रे़ड्डी यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटानंतर अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलाय. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अबरार या भूमिकेत तो या चित्रपटात झळकला होता. ही हटके भूमिका बॉबीने उत्तम पद्धतिने साकारली होती त्यामुळे सगळीकडून बॉबीच्या कामाचं कौतुक करण्यात आलं होतं. अनेक वर्षांनी बॉबी देओलला पुन्हा एकदा लोकप्रियता मिळताना पाहुन त्याच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला त्याचा अभिमान वाटतोय. तर ट्विंकल खन्ना ही अभिनय क्षेत्रापासून दूर असून लेखिका म्हणून काम करते. तिने अनेक पुस्तकांचंही लिखाण केलय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com