Salman Khan: लॉरेन्स बिश्नोईला पिकअप करण्यासाठी कॅब पाठवली, पण पत्ता थेट सलमानच्या घराचा दिला; 21 वर्षीय तरुणाला अटक

Lawrence Bishnoi: एका 21 वर्षीय तरुणानं तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला पिकअप करण्यासाठी कॅब पाठवली. पण त्यानं पत्ता मात्र सलमानच्या घराचा दिला.
लॉरेन्स बिश्नोईला पिकअप करण्यासाठी कॅब पाठवली, पण पत्ता थेट सलमानच्या घराचा दिला; 21 वर्षीय तरुणाला अटक
Salman Khanesakal
Updated on

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman khan) घराबाहेर गोळीबार झाला.या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याने स्वीकारली. या घटनेनंतर सलमानची आणि त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. अशातच आता आणखी एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका 21 वर्षीय तरुणानं तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला पिकअप करण्यासाठी कॅब पाठवली. पण त्यानं पत्ता सलमानच्या घराचा दिला.

कॅब ड्रायव्हर गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर आला अन्...

गुरुवारी एक कॅब ड्रायव्हर गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर आला. लॉरेन्स बिश्नोई कुठे राहतो? असं सुरक्षा रक्षकाला विचारले. त्याने सुरक्षा रक्षकाला सांगितले की, तो लॉरेन्स बिश्नोईला घेण्यासाठी आला आहे.

कॅब ड्रायव्हरला पोलिसांनी घेतलं ताब्यात

सलमानच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी लॉरेन्स बिश्नोईचे नाव ऐकल्यानंतर कॅब ड्रायव्हरला ताब्यात घेतले. त्यानंतर कॅब चालकाला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲग्रीगेटर सेवेद्वारे कॅब बुक करणाऱ्या एका व्यक्तीने ड्रायव्हरला गॅलेक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोई नावाच्या व्यक्तीला पिकअप करण्यास सांगितले. कॅब चालकाला सलमान खानच्या घराचा पत्ता माहीत नव्हता तसेच लॉरेन्स बिश्नोई हा एक गुंड आहे, हे देखील त्याला माहित नव्हते.

21 वर्षांच्या विद्यार्थ्यानं बुक केली होती कॅब

तपासात पोलिसांना आढळून आले की, ज्या व्यक्तीने कॅब बुक केली तो 21 वर्षांचा विद्यार्थी आहे. रोहित त्यागी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुलगा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे राहतो.

लॉरेन्स बिश्नोईला पिकअप करण्यासाठी कॅब पाठवली, पण पत्ता थेट सलमानच्या घराचा दिला; 21 वर्षीय तरुणाला अटक
Salman khan: गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; महाराष्ट्र पोलीस लॉरेन्स बिश्नोईची करणार चौकशी

पोलिसांचे पथक गाझियाबादमध्ये पोहोचले आणि रोहित त्यागीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com