Urvashi Rautela : उर्वशीचा बाथरूममधील व्हिडीओ लीक ! फेक व्हिडीओ की पब्लिसिटी स्टंट?

Urvashi Rautela Bathroom Video Got leak : अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
Urvashi Rautela Video leak
Urvashi Rautela Video leak Esakal
Updated on

Urvashi Rautela Viral Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे तिच्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया युझर्सना कमालीचा धक्का बसला आहे. २३ सेकंदांच्या क्लिपमध्ये रौतेला बाथरूममध्ये आंघोळीसाठी तयार होत असल्याचं दाखवलं आहे. पण हा व्हिडीओ डीपफेक आहे कि पब्लिसिटी स्टंट आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या आधीही आलिया भट्ट, रश्मिका मंदाना, कतरीना कैफ यांचे या आधी डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे उर्वशीचा व्हायरल झालेला व्हिडिओही AI चा वापर करून डीपफेक केलेला असावा असा चाहत्यांचा अंदाज आहे. तर काहींनी हा पब्लिसीटी स्टंट असावा एखाद्या प्रोजेक्टच्या प्रोमोशनसाठी हे केलं असावं असा अंदाज व्यक्त केला आहे.

याबाबत अजून अभिनेत्रीने किंवा तिच्या टीमने कोणत्याही प्रकारचं अधिकृत वक्तव्य अजून केलं नाहीये. ही क्लिप संवेदनशील असल्यामुळे आम्ही या बातमीमध्ये ती जोडली नाहीये. सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित झाल्यानंतर, अनेक इंस्टाग्राम युझर्सनी AI च्या होणाऱ्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रश्मिका मंदान्ना, काजोल, कतरिना कैफ, आमिर खान, रणवीर सिंग आणि सारा तेंडुलकर यांचे या आधी डीपफेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले होते.

Urvashi Rautela Video leak
Urvashi Rautela : होऊ दे खर्च! उर्वशीच्या वाढदिवसाला चक्क 'तीन कोटीं'चा केक? हनी सिंगचं मोठं गिफ्ट

दरम्यान, सरकार AI च्या वापराबाबत लवकरच कायदा आणणार असून यावर सध्या अभ्यास करण्यात येत आहे. युझर्सनी देखील लवकरात लवकर कायदा आणण्याची मागणी केली आहे.

दरम्यान उर्वशीने आतापर्यंत सिंह साब द ग्रेट, ग्रेट ग्रँड मस्ती आणि हेट स्टोरी 4 या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या ती काही दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करत असून मध्यंतरी ती सिनेमाच्या सेटवर जखमी झाल्याची बातमी समोर आली होती.

Urvashi Rautela Video leak
Urvashi Rautela: "माझं मत तुलात," लोकसभेसाठी तिकिट मिळाल्याचा उर्वशीचा दावा, सोशल मीडियावर मात्र कमेंट्सचीच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.