आज १६ जून २०२४ रोजी जागतिक फादर्स डे साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने अनेक कलाकार आपल्या वडिलांसोबतचे आणि मुलांसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. याच निमित्ताने अभिनेता वरुण धवन यानेही त्याच्या मुलीची पहिली झलक शेअर केली आहे. त्याने त्याच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. वरुण धवन नुकताच बाप झाला आहे. त्याची पत्नी नताशा दलाल हिने ३ जून रोजी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. वरुण आणि नताशा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. आता फादर्स डे निमित्त वरुणने त्याच्या मुलीचा गोड फोटो शेअर केला आहे.
चाहते अनेक दिवस वरुणच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरले होते. चाहते उत्सुकतेने तिच्या फोटोची वाट पाहत होते. आता अखेर वरुणने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. त्याने आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्याच्या १३ दिवसांच्या लेकीने त्याचा हात घट्ट पकडला आहे. तिचा चिमुकला हात पाहून चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. या फोटो तिचा चेहरा दिसत नसला तरी तिचा गोंडस हात पाहून चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यांचा हा फोटो पाहून चाहते त्यांच्यावर फिदा झाले आहेत. तर या फोटोसोबतच वरुणने आणखी एक फोटो शेअर केला आहे त्यात त्याने त्याच्या पाळीव श्वान जॉयचा पंजा पकडला आहे.
ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं, 'हॅप्पी फादर्स डे. माझ्या वडिलांनी मला शिकवलंय की हा दिवस साजरा करण्याची सगळ्यात योग्य पद्धत म्हणजे आपल्या कुटुंबासाठी बाहेर जाऊन काम करणं. त्यामुळे मीसुद्धा हेच करणार. एका मुलीचा वडील असण्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.' त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.