Marathi Serial Vatpaurnima: वटपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आल्या 'सावित्री', मराठी मालिकांमधील कलाकारांची वटपौर्णिमा

Vatpaurnima: मराठी मालिकांमध्ये वटपौर्णिमेच्यानिमित्ताने खास भाग पाहायला मिळत आहेत.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आल्या 'सावित्री', मराठी मालिकांमधील कलाकारांची वटपौर्णिमा
Marathi Serial Vatpaurnimasakal

Marathi Serial Vatpaurnima: ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात. हाच उत्साह मनोरंजन विश्वातही दरवर्षी पाहायला मिळतो. घराघरात पोहोचलेल्या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा (Vatpaurnima) उत्साह पाहायला मिळतोय. कलर्स मराठी वाहिनीवर विविध मालिका पाहायला मिळतात. या मालिकांमध्येही आपली संस्कृती जपत विविध सण, उत्सव साजरी होताना दाखवली जातात. सध्या सर्व मालिकांमधील वटपौर्णिमेचा व्हिडीओ समोर आलाय.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळतय की, 'इंद्रायणी' या मालिकेमधील शकुंतला वडाच्या झाडाला कुंकू लावतेय, तर झाडामागून 'अंतरपाट' मालिकेतील गौतमी हातात धागा घेऊन क्षितिजसोबत सुरु होणाऱ्या नव्या संसाराचे सुख मागत आहे. दुसरीकडे 'अबीर गुलाल' मालिकेतील श्रीची आई वडाच्या झाडामागून येताना दिसत असून 'रमा -राघव' मालिकेतून रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ सात जन्म मिळावी यासाठी प्रार्थना करतेय.

'पिरतीचा वनवा उरी पेटला ' या मालिकेतून सावी अर्जुनची साथ मागत आहे. तर 'सुख कळले' या मालिकेतून मिथिला तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत आहे. या मालिकांमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने खास भाग पाहायला मिळत आहेत. यात 'इंद्रायणी' या मालिकेत वटपौर्णिमेच्या शुभदिनी शकुंतला पूजेसाठी इंदूला घेऊन जाते. आनंदी या समारंभात इंदूच्या उपस्थितीवर आक्षेप घेते. परंतु झाडाजवळ साप दिसल्यावर इंदू धैर्याने अधूला जवळ घेत त्याचे सापापासून रक्षण करते. तेच 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेत एकीकडे सावी अर्जुनसाठी वटपौर्णिमेची पूजा करत असून बाच्याला सावीबद्दल भावना निर्माण होत आहेत. 'सुख कळले' या मालिकेत माधव मिथिलाला वचन देतो की, वटपौर्णिमेपर्यंत तो बँकेच्या फसवणुकीमागील खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधून काढणार आहे.

या सगळ्यात या महिला कलाकारांचा साज, श्रृंगार पाहायला मिळतोय. साड्या नेसून, नटून थटून या सावित्रींचा खास अंदाज पाहायला मिळतोय. हे सगळेच वटपौर्णिमा स्पेशल भाग प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतील एवढं नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com