'छावा' मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला ओळखलंत का? कधीकाळी होता बॉलिवूडचा टॉप अभिनेता

Who Is Playing Aurangzeb In Chhaava: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोण करतंय तुम्हाला ठाऊक आहे का?
chhaava actor
chhaava actor esakal
Updated on

Chhaava Movie Star Cast: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आज रक्षाबंधनाच्या दिवशी या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील विकीचा लूक पाहून चाहते उत्साहित झाले आहेत. या चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसतोय. संभाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम या टीझरमध्ये दिसत आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यासोबतच आणखी एका गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रानहली आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये औरंगजेबदेखील दाखवण्यात आला आहे. तुम्ही या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का?

मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसूबाईंच्या भूूमिकेत झळकणार आहे. तर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही विशेष भूमिकेत दिसणार आहे. ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे मात्र त्यासोबतच चित्रपटात इतर भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यात टीझरमध्ये औरंगजेबाचा चेहरा दाखवण्यात आला आहे. यात तो म्हणतो, शिवा गेला पण त्याचे विचार सोडून गेला. चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला अनेक प्रेक्षक ओळखू शकलेले नाहीत. चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना साकारत आहे.

अक्षय खन्ना या भूमिकेत अतिशय वेगळा दिसत आहे. उत्तम मेकअप केल्याने तो ओळखू येत नाहीये. अक्षयचा आवाजही ओळखू येत नसल्याने त्याला अनेकांनी ओळखलं नाहीये. मात्र आता प्रेक्षक त्याला औरंगजेबाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

chhaava actor
Chhaava: एकेकाळी मुंबईत वडापाव विकणाऱ्या मराठी तरुणाने बनवलाय छावा! शंभुराजांचा धगधगता इतिहास आणला पडद्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.