Abhishek bachchan: अभिषेक बच्चनच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक; लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

Abhishek bachchan: अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 अभिषेक बच्चनच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक; लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Abhishek bachchanESAKAL
Updated on

Abhishek bachchan: प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान (A. R. Rahman) यांना त्यांच्या संगीतक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 'मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' (Lata Deenanath Mangeshkar Award) देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीतक्षेत्रात सर्वोत्कृष्ट योगदान देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याचे फोटोज चर्चेत आहेत.

ए आर रहमान यांनी सोशल मीडियावर पुरस्कारासोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,"दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने माझा सन्मान केल्याबद्दल मी भारावून गेलोय. मंगेशकर परिवाराचा वारसा आणि कलेबद्दल असलेलं त्यांचं प्रेम याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे. " असं म्हणत त्यांनी संपूर्ण मंगेशकर कुटूंबाचे या पुरस्कारासाठी आभार मानले.

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ए आर रहमान यांनी हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या भावना स्टेजवर सगळ्यांसमोर व्यक्त केल्या. त्यांचे वडील मंगेशकर कुटूंबाचा किती आदर करायचे हे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं. जेव्हा त्यांचे वडील साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करायचे तेव्हा ते लता मंगेशकर यांच्या फोटोचं दर्शन घेतल्यावरच अंथरुणातून उठत असल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. "मी कायमच माझ्या पत्नी आणि मुलांना मंगेशकर कुटूंबाच्या कलेविषयी असलेल्या प्रेमाबद्दल सांगतो आणि मला हृदयनाथ यांचे सगळे गुण आवडतात." असं त्यांनी यावेळी भाषणात म्हंटलं.

अभिषेकच्या कृत्याचं झालं कौतुक (Abhishek Bachchan Video Viral)

ए आर रहमान यांच्यासोबत अभिनेते अमिताभ बच्चन यांचाही लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अमिताभ यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेकही उपस्थित होता. यावेळी अभिषेकच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. झूम टीव्हीने अभिषेकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. अभिषेकचा स्टेजवर पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्याने स्टेजवर बसलेल्या हृदयनाथ मंगेशकर यांना नमस्कार केला तर उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ घेतल्यावर अभिषेकने त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. तर आयोजकांनी त्याला स्टेजवर बसण्याचा आग्रह केल्यावर त्याने नम्रपणे नकार दिला आणि तो प्रेक्षकांमध्ये असलेल्या त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याच्या संस्कारांचं कौतुक होतंय.

'या' कलाकारांचा झाला सन्मान

दरम्यान, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. दरवर्षी मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.यावेळी अमिताभ बच्चन, अशोक सराफ, मंजिरी फडके, पद्मिनी कोल्हापुरे, रुपकुमार राठोड, अतुल परचुरे, रणदीप हुडा यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.