Farah Khan : फराह खानला मातृशोक ; "आपण आपल्या आईला गृहीत धरतो", शेअर केली भावूक पोस्ट

Farah Khan's mother passed away : कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानची आई मेनका इराणी यांचं आज निधन झालं.
Farah Khan Mother
Farah Khan MotherEsakal
Updated on

बॉलिवूडमधील आघाडीची कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान हिच्या आईचं मेनका इराणी यांचं आज 26 जुलैला निधन झालं. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्यावर गेल्या काही काळत अनेक शस्त्रक्रिया झाल्या होत्या. फरहाने ही बातमी तिच्या युट्युब चॅनेलमार्फत शेअर केली होती.

12 जुलैला फराहने तिच्या आईचा वाढदिवस शेअर केला. त्यावेळी तिने तिच्या आईच्या तब्येतीची बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली. तिची आई आजारी असून तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्याचं तिने सांगितलं. पण त्यांच्या अचानक निधनाने फराह आणि मुलगा साजिदला धक्का बसला आहे.

फराहने आईच्या निधनापूर्वी तिच्या वाढदिवसाला एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिलेलं, 'आपण सर्वजण आपल्या आईला गृहीत धरतो..विशेषतः मला! गेल्या महिन्यात मी माझ्या आई मेनकावर किती प्रेम करते याची जाणीव झाली... ती आजवर मी पाहिलेली सर्वात मजबूत, धाडसी व्यक्ती आहे.. अनेक शस्त्रक्रियांनंतरही आनंदी राहण्याची तिची भावना अबाधित आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! घरी परतण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे ♥️ माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करण्यासाठी तुझ्या इतकी मजबूत होण्याची वाट पाहू शकत नाही.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.

आता आईच्या निधनाने फराह खान कोलमडून गेली आहे. आईच्या जाण्याने तिच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या बातमीनंतर चाहते तिचं सांत्वन करत आहेत आणि तिच्या आईसाठी प्रार्थना करत आहेत. फराह खान एक लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर असून तिने अनेक लोकप्रिय गाण्यांचं दिग्दर्शन केलं आहे. तिने 'हॅप्पी न्यू इयर', 'ओम शांती ओम', 'तीस मार खान' असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

Farah Khan Mother
Viral Video : अनंत अंबानींच्या हळदीला रणवीर-हार्दिकचा धुमाकूळ ; भन्नाट डान्स, ढोलवादन आणि बरंच काही, नेटकरी म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.