Bollywood Entertainment News : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचं आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलं आहे. सलमानने जितकं नाव कमावलं तितकंच त्याचं नाव वादांशी जोडलं गेलं. कधी दारूच्या नशेत केलेला कार अपघात तर कधी काळवीट शिकार प्रकरण तर कधी ऐश्वर्या राय सोबत असलेलं प्रेमप्रकरण यामुळे सलमान कायमच चर्चेत राहिला.
1998 साली रिलीज झालेल्या 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याने काळवीट हरणांची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. हे प्रकरण बरंच चर्चेत राहिलं. या प्रकरणात त्याला तुरुंगवासही भोगावे लागलाय. त्यातच आता बाबा सिद्दिकी यांच्या खुनानंतर आणि सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.