Bollywood Entertainment News : अभिनता अजय देवगण सध्या सिंघम अगेन या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. रोहित शेट्टीने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. नुकतच एका मुलाखतीत रोहित अजय देवगणची एक भावनिक आठवण शेअर केली. .अजय आणि रोहितने सिंघम अगेनच्या प्रोमोशनसाठी रणवीर अलाहबादीयाच्या चॅनेलवर हजेरी लावली. यावेळी रोहितने अजय यांची एक भावनिक आठवण शेअर केली. जॉनी लिव्हर यांच्याविषयी सांगताना रोहितने हा किस्सा शेअर केला. जॉनी यांनी अजयला कशी मदत केली हे ही त्याने सांगितलं. .रोहित म्हणाला,"राजू चाचा हा अजयचा सिनेमा फ्लॉप ठरला. अजयने या सिनेमाची निर्मिती केली होती. त्याचं खूप मोठं नुकसान झालं. अजयने मिळेल ती फिल्म स्वीकारून सगळ्या कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे पैसे परत केले. त्याने कोणाचेही पैसे शिल्लक ठेवले नाहीत. त्या सिनेमात जॉनी लिव्हरही होते. त्यांना जेव्हा पैसे द्यायला अजय गेला तेव्हा त्यांनी ते नाकारले. सिनेमाचं नुलसं झाल्यामुळे मला पैसे नको असं ते म्हणाले. पण तरीही आम्ही त्यांना पैसे दिले. त्यानंतर जेव्हा अजयने ऑल द बेस्ट या सिनेमाची निर्मिती केली तेव्हा जॉनी यांनी मानधनाचा एक रुपयाही घेतला नाही. त्यावेळी अजयने पैसे दिल्यामुळे आता ते पैसे स्वीकारणार नाहीत असं त्यांनी सांगितलं.".Prateik Babbar : 'आमचं नातं कुणाला सांगायचं नव्हतं!' स्मिता पाटील यांच्या प्रतिकची गर्लफ्रेंड आहे तरी कोण? .सोशल मीडियावर हा किस्सा चर्चेत आहे. अजयच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होतंच आहे पण जॉनी यांचंही अनेकांनी कौतुक केलं. अजय एक चांगला माणूस आहे अशी कमेंट अनेकांनी या व्हिडिओवर केली आहे तर जॉनी यांच्या माणुसकीचही अनेकांनी कौतुक केलं. .सिंघम अगेनने आतापर्यंत 275 करोड रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाचं खूप कौतुक होतंय. अजय आणि रोहित शेट्टी यांनी या सिनेमाची निर्मितीही केली आहे. .Sholay : सचिन यांनी असं वाचवलं शोलेमधील गब्बरचं करिअर ; हा भन्नाट किस्सा जरूर वाचा .ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.