Ashok Saraf : "हा रोल तुझा नाही" म्हणत जेव्हा दादांनी अशोक सराफ यांना सिनेमातून काढलं

When Dada Kondke asked Ashok to leave movie set : आज अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्याविषयीचा खास किस्सा.
Ashok Saraf B'day special story
Ashok SarafEsakal
Updated on

मराठी अभिनेते अशोक सराफ म्हणजेच सगळ्यांचे लाडके अशोक मामा यांचा आज वाढदिवस. आजवर मराठीबरोबरच हिंदीतही अशोक यांनी स्वतःची वेगळी ओळख कमवली आहे.

त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. पण दादा कोंडकेंसोबत त्यांनी केलेले सिनेमे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण तुम्हाला माहितीये का ? दादा कोंडकेंनी अशोक सराफ यांना एका सिनेमातून काढून टाकलं होतं. जाणून घेऊया हा खास किस्सा

म्हणून सोडला सिनेमा...

अशोक सराफ आणि दादा कोंडके यांनी पहिल्यांदा पांडू हवालदार या सिनेमात काम केलं. या सिनेमातील त्या दोघांची केमिस्ट्री, कॉमेडी टायमिंग अनेकांना आवडलं. यानंतर त्याची एखाद्या सिनेमात काम केलं पण त्यानंतर अशोक यांनी स्वतःहून या सिनेमात काम करायला होकार दिला. हा सिनेमा होता 'येऊ का घरात?'.

या सिनेमाचं दिग्दर्शन दादांनीच केलं होतं. या सिनेमात अशोक यांना दादांनी एका मुस्लिम अंडीवाल्याची भूमिका दिली होती. त्यावेळी अशोक यांची कारकीर्द उत्तम सुरु झाली होती. अशोक यांना स्क्रिप्ट मिळताच त्यांना त्यांची भूमिका खूप लहान आहे असं वाटलं आणि त्यांनी ही गोष्ट लगेच दादांना सांगितली.

दादांनाही त्यांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी विचार केला कि,'अशोकने जर ही भूमिका केली तर लोक मलाच नावं ठेवतील. अशोकचा फायदा घेतला असं लोकांना वाटेल.' म्हणून दादा अशोक मामांना म्हणाले कि, "हा रोल तू केलास तर तुझा मोठेपणा दिसेल पण लोक मला हसतील. माझी नाचक्की होईल त्यामुळे हा रोल तुझा नाहीच. " असं म्हणत त्यांनी अशोक मामांना मेकअप पुसायला लावला. त्यानंतर हा रोल विजय चव्हाण यांनी केला.

दादा कोंडकेंनी हा किस्सा त्यांचं आत्मचरित्र असलेल्या 'एकटा जीव' या पुस्तकात सांगितला आहे.

Ashok Saraf B'day special story
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी पहिली एकांकिका गाजवली ; सेट, म्युझिक काही नाही फक्त अभिनयातून साकारली एकांकिका

म्हमद्याच्या भूमिकेचं केलं कौतुक

दादांसोबतच अशोक सराफ यांनी आणखी एका सिनेमात काम केलं आणि हा सिनेमा होता 'राम राम गंगाराम' या सिनेमात त्यांनी साकारलेला म्हमदू खाटीक सगळ्यांना आवडला. या भूमिकेसाठी अशोक मामांनी एक वेगळी भाषा शिकली होती. ही ग्रामीण मराठी मिश्रित थोडी वेगळी भाषा होती आणि त्यासाठी अशोक मामांनी थोडा आवाजही बदलला होता. त्यांची ही भूमिका लोकप्रिय ठरली आणि खुद्द दादा कोंडकेंनीही त्यांचं कौतुक केलं.

Ashok Saraf B'day special story
Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.