Nawazuddin Siddiqui : जेव्हा नवाजुद्दीन यांना लागलेलं गांजाचं व्यसन ; म्हणाले,"दिवसभर गांजाच्या नशेमध्ये..."

Nawajuddin Siddiqui talks about his addiction : अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना लागलेल्या व्यसनासंबंधी महत्त्वाचं वक्तव्य केलं.
Nawajuddin Siddiqui
Nawajuddin Siddiqui Esakal
Updated on

Nawazuddin Siddiqui Interview : बॉलिवूडमध्ये उशिरा का होईना पण प्रभावी अभिनयाने स्वतःचं स्थान निर्माण करून आता दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत सामील झालेले अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui ) त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अनेकदा त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी त्यांना लागलेल्या व्यसनाबद्दल भाष्य केलं.

दिवसभर असायचे नशेत

नवाजुद्दीन यांनी नुकतीच रणवीर अलाहबादीया (Ranveer Allahbadia) या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना त्यांना लागलेल्या व्यसनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं कि,"कॉलेजला असताना मला गांजाचं व्यसन लागलं होतं. ते अर्थात वाईट होतं पण त्यामुळे जी सुन्नता यायची ती मला आवडायची. मी त्यात हरवून जायचो. पुढे ते बंद झालं. मी बऱ्याचदा भांगही प्यायलो आहे. जेव्हा मी भांगेच्या नशेत असायचो तेव्हा सगळं जग माझ्यासाठी स्टेज असायचं आणि माझे मित्र माझे प्रेक्षक असायचे. मग अंधायुग नावाचं नाटक होतं त्यातील वेगवेगळी पात्रं मी सादर करायचो. मी कधी कृष्ण असायचो, कधी कर्ण असायचो, कधी अश्वत्थामा असायचो आणि मी त्यांचे संवाद सारखे सारखे म्हणायचो. मग जेव्हा नशा उतरायची तेव्हा मित्र मला ओरडायचे आणि ते मला सांगायचे कि मी दिवसभर तेच बोलत असायचो. कॉलेजमध्ये असतानाच या वाईट सवयी लागतात आणि याची मजाही येते पण माझी एक सवय आहे ज्या गोष्टीची मला मजा येते त्या गोष्टी मी लवकर सोडून देतो."

Nawajuddin Siddiqui
Nawazuddin Siddiqui : अपघातातून नवाझुद्दीन थोडक्यात बचावला! 'सैंधव' च्या शुटींगच्या दरम्यान घडली घटना

कारकीर्द

नवाजुद्दीन यांनी दिल्लीमधील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये (National School Of Drama) नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं मग सिनेमात काम करण्यासाठी ते मुंबईत आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी सिनेमात अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या पण त्यांना ओळख मिळाली ते पिपली लाईव्ह या २०१० साली रिलीज झालेल्या सिनेमातून. या सिनेमात त्यांनी साकारलेली पत्रकाराची भूमिका अनेकांना आवडली पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती गँग्ज ऑफ वासेपूर या अनुराग कश्यप दिग्दर्शित सिनेमामुळे. या सिनेमात त्यांनी साकारलेला फैजल खान गाजला. तर त्यांच्या रमण राघव २.०, सेक्रेड गेम्स हे प्रोजेक्टही गाजले.

Nawajuddin Siddiqui
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा पत्नीसोबतचा वाद अखेर मिटला; आलिया म्हणाली, "ऑप्शन नाहीये..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.