Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील सिनेमांबरोबरच तेथील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सगळ्यांनाच आकर्षण आहे. त्यांच्यातील मैत्री, नातेसंबंध, बॉलिवूड पार्टीजमध्ये घडणाऱ्या गोष्टी याविषयी जाणून घ्यायला लोक उत्सुक असतात. 70 ते 90 च्या दशकात बॉलिवुड पार्टीज या खाजगी असायच्या पण त्यातील चर्चा कधीच बाहेर आल्या नाहीत. त्यातीलच अशा एका पार्टीमध्ये ऋषी कपूर यांचं संजय खान यांच्याबरोबर जोरदार भांडण झालं होत.