Who Is Hastar of Tumbbad : कोण आहे तुंबाड चित्रपटातील हस्तर, त्याचा नेमका मॅटर काय आहे?

story of Hastar : प्राचीन ग्रंथात आणि पुराणांमध्ये हस्तरचा कुठलाही उल्लेख नाही. म्हणजेच चित्रपटात ज्या हस्तर देवाची गोष्ट सांगितली आहे ती संपूर्ण काल्पनिक आहे.
who is hastar of tumbbad movie villain back story of creature hastar marathi news
who is hastar of tumbbad movie villain back story of creature hastar marathi news
Updated on

सोहम शाह यांचा चित्रपट तुंबाड हा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, पण याची चर्चा आता तो पुन्हा रिलीज केल्यानंतर होत आहे. या चित्रपटातील एक पात्र हस्तरच्या बाबतीत लोकांना अजून जाणून घेण्याची इच्छा आहे. आज आपण या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या या हस्तरबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

तुंबाड चित्रपटातील हस्तरबद्दल सांगितले जाते की, तो त्या देवीचा सर्वात लाडका पुत्र आहे, जीने सर्व देवी देवतांना जन्म दिला. चित्रपटात हस्तर एक पौराणिक देवता म्हणून दाखवण्यात आले आहे. जो धन आणि धान्याचा देवता आहे. चित्रपटाच्या कथेनुसार हस्तर एक लालची आणि स्वार्थी देवता होता, ज्याला त्याच्या वाट्यापेक्षा जास्त हवे होते.

त्याने देवीच्या खजान्यातील सर्व सोने घेतले आणि नंतर सर्व धान्य देखील घेण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या देवतांनी त्याला धान्य घेऊ दिले नाही. त्यावर हल्ला केला. त्यानंतर धान्य त्याला मिळू शकले नाही. याशिवाय त्याला सर्व धार्मिक ग्रथांमधून गायब करण्यात आले आणि संपूर्ण जग त्याच्या अस्तित्वाबद्दल विसरून गेले. चित्रपटानुसार हस्तर आत्ताही आपल्या आईच्या पोटात कैद आहे.

who is hastar of tumbbad movie villain back story of creature hastar marathi news
Supreme Court : पाहणेच नाही तर डाऊनलोड करुन ठेवणेही गुन्हाच! सुप्रीम कोर्टाचा 'चाइल्ड पॉर्नोग्राफी'बाबत मोठा निर्णय

प्राचीन ग्रंथात आणि पुराणांमध्ये हस्तरचा कुठलाही उल्लेख नाही. म्हणजेच चित्रपटात ज्या हस्तर देवाची गोष्ट सांगितली आहे ती संपूर्ण काल्पनिक आहे. मात्र इंटरनेटवर एक वेबसाइट आहे फँडम डॉट कॉम ज्यावर देवता आणि राक्षसांबद्दल माहिती दिली जाते. यावर दिलेल्या माहितीनुसार हस्तर खरंच होता. मात्र त्याचे हिंदू धर्माशी काही देणेघेणे नाही. या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार हस्तर चांगला देव होता, मात्र काही लोकांनी त्याची प्रतिमा मलिन केली, जेणेकरून तो मानवतेची कुठलीही मदत करू शकणार नाही.

हस्तरबद्दल सांगितले जाते की, त्याचे नाव घेऊ नये, असे केल्यास विनाश होईल. तर हस्तरच्या रुपाबद्दल या वेबसाइटवर सांगण्यात आले आहे की, त्याचे डोके एखाद्या ऑक्टोपस सारखे होते, तर त्याचे पंख हे वटवाघळासारखे होते. तर त्याचे डोळे सोनेरी होते. तो नेहमी पिवळ्या रंगाचया कापडाखाली झाकलेला असे. एबीपी हिंदीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

who is hastar of tumbbad movie villain back story of creature hastar marathi news
Tumbbad 2 : तुंबाड 2 मधून दिग्दर्शक राही अनिल बर्वेची एक्झिट ; केली नव्या दोन प्रोजेक्टसची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.