Zapatlela 3: मराठी सिनेइंडस्ट्रीत असे अनेक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. यातीलच एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे झपाटलेला. तात्या विंचू या बाहुल्याची गोष्ट असलेला हा थरारपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना धडकी भरवायला येतोय. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी नुकतीच झपाटलेला 3 (Zapatlela 3) या सिनेमाची घोषणा केली.
राजश्री मराठी या चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार महेश कोठारे लवकरच झपाटलेला या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. झपाटलेला २ प्रमाणे याही सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत असेल पण त्याच्यासोबतच आणखी एक नवीन पात्र या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाविषयी सांगताना महेश कोठारे राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,"झपाटलेला चित्रपटाच्या फ्रँचायझीमधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत."
महेश कोठारे यांनी या सिनेमाची घोषणा करताच अनेकांनी हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हंटलं. झपाटलेला 2 मध्ये आदिनाथासोबत सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकर आणि महेश कोठारे यांची मुख्य भूमिका होती. आता झपाटलेला 3 या सिनेमात नेमकं काय कथानक असेल? तात्या विंचू त्याची दहशत पसरवायला परत कसा येणार? हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.
१९९३ साली झपाटलेला हा सिनेमा रिलीज झाला होता. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, किशोरी अंबिये, पूजा पवार यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती तर दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या तात्या विंचूने सगळ्यांची मनं जिंकली. बराच काळ प्रेक्षकांना तात्या विंचूची भूमिका दिलीप यांनी साकारली आहे याची कल्पनाच नव्हती. तात्याचा जीव बाहुल्यात गेल्यानंतर त्याला झपाटलेला बाहुला म्हणून दाखवण्यात शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी घेतलेली मेहनत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नव्वदच्या दशकात या सिनेमाने उत्तम कमाई केली होती. आजही हा सिनेमा प्रेक्षक आवर्जून पाहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.