प्रीमियम आर्टिकल
ऐंशीच्या दशकात निपाणीतील 'रक्तरंजित क्रांती', पोलीस- शेतकरी संघर्षाची कहाणी
आज आपण बरीच आंदोलनं पाहतो, परंतु कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांच्या दोन्ही सीमेवर असलेल्या निपाणीत तब्बल चाळीस वर्षांपूर्वी पन्नास हजाराहून अधिक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून बेछूट गोळीबार झाला होता. पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांच्या रक्तानं माखला होता. यात काही शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, तर काही शेतकरी गंभीररित्या जखमी झाले होते. तर अनेक शेतकरी आपल्या निधड्या छतीनं पोलिसांचा गोळीबार आपल्या अंगावर झेलत होते. हे सगळं घडत होतं, केवळ तंबाखूच्या हमीभावासाठी, दरासाठी; पण कर्नाटक शासनाला याचा कोणताच फरक पडत नव्हता. पोलिसांकडून बेछूट गोळीबार सुरुच राहिला अन् संबंध कर्नाटकाच्या इतिहासात निपाणी तालुका 'रक्तरंजित' झालेला पहायला मिळाला. आजही या घटनेच्या जखमा ताज्या आहेत.