मुंबई: साल २०२२ मध्ये जगातील घराघरांतून एकीकडे १०० कोटी जेवणं (एका व्यक्तीला एका वेळी लागेल इतके अन्न म्हणजे एक जेवण) वाया जात असताना दुसरीकडे ७८ कोटी लोक भुकेले किंवा अन्नाची चणचण भासणारे असल्याचे अहवालातून समोर येते आहे. याचा परिणाम जगातील अर्थव्यवस्थेसोबतच, वातावरणातील बदल, निसर्गाची हानी आणि पर्यावरणावर होताना दिसतो आहे. काहीच दिवसांपूर्वी 'युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रम अहवाल' प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामधून हे महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत.