सुधाकर कुलकर्णी:
सर्वसामान्य गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी पारंपरिक पर्यायांची प्राधान्याने निवड करतात. यात बँकेतील मुदतठेवी, पोस्टातील एनएससी, पीपीएफ, सोने, आयुर्विमा, घर, जमीन आदींचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांपासून शेअर, म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करण्याकडे कल वाढू लागला आहे. त्याहीपुढे जाऊन आता आभासी चलन, पिअर टू पिअर लेंडिंग असे काही आधुनिक, नावीन्यपूर्ण पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात गुंतवणूक करण्याकडेही लोक वळू लागले आहेत.