प्रा. किशोर कुलकर्णी
अमेरिकेत आणि भारतात यंदा म्हणजे २०२४ या वर्षात जी बृहद् आर्थिक स्थिती दिसून आली, त्या दोन्ही चित्रांची तुलना करुन आर्थिक प्रवाहांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.
हे लेखन करताना मला आनंद वाटतोय कारण मी अमेरिकेतील विद्यापीठांत गेली ४४ वर्षे प्रामुख्याने बृहद्अर्थशास्त्र (मॅक्रोइकॉनॉमिक्स) अभ्यासक्रम शिकवत आलो असल्याने अमेरिकेतील आर्थिक बदल जवळून बघतोय.
दुसरीकडे माझी पार्श्वभूमी पुण्याची असून, मी अर्थशास्त्रातील शिक्षण पुणे विद्यापीठांतर्गत घेतले आहे. मी बीए (एजी कॉलेज) आणि एमए (गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स) या पदव्या घेतल्यानंतर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पीट्सबर्ग येथून एमए व पीएचडी या पदव्या घेतल्या.
त्यामुळे मी गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचेही निरीक्षण करत आलो आहे.