Anil Ambani Rich to Bankrupt Key Takaway
दूरसंचार-मनोरंजन-वित्तीय सेवा-ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सहा अतिशय महत्त्वाच्या क्षेत्रांतील अग्रेसर कंपन्यांचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर कारवाई करताना, ‘सेबी’ने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी भांडवली बाजारात येण्यास मज्जाव केला आहे; तसेच दंड ठोठावला आहे. २००५ मध्ये जेव्हा अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्स कॅपिटल लि. सोपवण्यात आली, तेव्हा त्यामध्ये इतर अनेक कंपन्या होत्या. यामध्येच एक होती रिलायन्स होम फायनान्स लि. (आरएचएफएल) जी आज एक लिस्टेड एनबीएफसी कंपनी आहे. ‘सेबी’ला या कंपनीमध्ये काही घोटाळा वाटल्याने त्याची चौकशी झाली आणि होते आहे. असे ऐकिवात आहे, की २०१८-१९ या काळात नियमांचे उल्लंघन करून यामध्ये तब्बल ८००० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. रावाचा रंक होण्यास काय महत्त्वाची कारणे झाली आणि आपण त्यातून काय शिकले पाहिजे, ते थोडक्यात पाहू.