मुंबई: "जेव्हा तुम्ही तुमच्या रोमँटिक पार्टनरला सुद्धा नाकारायला लागता तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला अगदी स्पष्ट लक्षणे सांगत असते. जी लक्षणे खरे तर आजवर तुम्हाला कधीही जाणवलेली नव्हती . डोकेदुकी, मळमळ, तोंडावर पुरळ येणे, लठ्ठपणा वाढू लागणे, हार्मोनल इम्बॅलन्स होणे, शक्ती गेल्यासारखे वाटणे ही सगळी लक्षणे तुम्हाला जाणवू लागतात आणि तुमचं नातं संपण्याच्या मार्गावर आहे याचे स्पष्ट संकेत देणारी ही लक्षणे असतात. अनेकदा काही समस्यांचे कारण हे तुमच्या भोवतीची माणसं असू शकतात." एका परदेशातील मुलीने सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टला २५ लाख लोकांनी पाहिले, २४ जाहीर लोकांनी ते लाईक केले आणि साडेसहा हजार लोकांनी हे शेअर केले.
सध्या रिलेशनशिप आणि त्यातून होणारी भावनिक गुंतागुंत तर सर्वत्रच पाहायला मिळते मात्र त्याचे परिणाम शरीरावरही होत असल्याचे दाखले अनेकांना मिळाले आहेत. त्यामुळेच एकुणातच 'हेल्दी रिलेशनशिप' हा मुद्दा सर्वार्थाने चर्चिला जाताना दिसतो आहे.