क्रिकेट हा भारतीयांच्या भावनांशी जोडला गेलेला खेळ आहे. इथे भारतीय संघाच्या विजयाचा जोरदार जल्लोष केला जातो, पराभवाच्या वेदना मनाला टोचतात, मोठ्या स्पर्धेतील अपयशानंतर इथे खेळाडूंच्या घरांवर हल्लेही झालेले आहेत, स्टेडियमवर जाळपोळही झालीय... इतका हा खेळ भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण, भावनांपलिकडे या खेळाने मोठी आर्थिक झेप घेतली आहे. आयपीएलच्या धर्तीवर जगभरात क्रिकेट लीगचे आयोजन केलं जातंय.. यातलीच एक लीग म्हणजे इंग्लंडमधील दी हंड्रेड लीग... सध्या या लीगची युरोपमध्ये चर्चा सुरू आहे, परंतु त्यांना आयपीएल फ्रँचायझीकडून मदतीची गरज भासली आहे. यानिमित्त क्रिकेटमधील अर्थकारण, खेळाडूंवरील पैशांचा पाऊस आणि क्रिकेट बोर्डाची कमाई याचा घेतलेला आढावा....