विशाखा बाग
जगातील आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असणाऱ्या देशांमधील (इमर्जिंग मार्केट) अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थांवर पॉलिटिकल इकॉनॉमीचा म्हणजे सरकारी धोरणांचा असलेला अंकुश आणि त्यामुळे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वेगाला लागणारा लगाम, भारतात १९८० पासून २०१० पर्यंत असलेली अशीच परिस्थिती या सर्व बाबी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या ’क्वेस्ट फॉर रिस्टोअरिंग फायनान्शिअल स्टॅबिलिटी इन इंडिया’ या पुस्तकात मांडल्या आहेत.