India Canada Relations: आपण भारतीय देशांतर्गत भलेही लढू पण देशाबाहेर गेल्यावर कायम भारतीय असतो, एक असतो. पण आता चित्र बदलतंय का? नुकतंच कॅनडामध्ये जे काही झालं, त्यावरुन तरी असं म्हणायला हरकत नाही.
आधीच भारत आणि कॅनडा यांच्यातले राजनैतिक संबंध काही फारसे बरे नाहीत. नात्याचा हा तिढा काहीसा गुंतागुंतीचा आहे.
कॅनडातल्या ब्रॅम्प्टन इथे एका हिंदु मंदिरावर हल्ला झाला. तो करणारा मुस्लिम किंवा ख्रिश्चन नव्हते तर ते होते तथाकथित खलिस्तानवादी शीख. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या हल्ल्याची दखल घेत त्याचा निषेध केलाय.
या हल्ल्याचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी लगेचच या हल्ल्याचा निषेध केलाय खरा पण कॅनडात या हल्ल्यासंदर्भात कुणालाही अटक करण्याचे आदेश दिले गेलेले नाहीत.