निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै २०२४ला अर्थसंकल्प सादर केला. गेल्या सात वर्षांचा त्यांचा अनुभव यात निश्चितच कामी आला आहे. दिवसभरात आपण यावर बरंच काही ऐकलं आहे, वाचलं आहे..कोणत्या क्षेत्राला झुकतं माप ? कोणत्या गोष्टी महाग झाल्या? कोणत्या स्वस्त झाल्या? कोणत्या राज्यांसाठी किती निधी तरतूद केली? या सगळ्याची माहिती सकाळच्या वेबसाइट, यूट्युब वृत्तपत्रातून मिळेलच.पण अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर शेअर मार्केटची काय स्थिती आहे, कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायला हवेत, कोणत्या नाही याविषयीसुद्धा अनेकांच्या मनात प्रश्न असतात..सनदी लेखापाल, गुंतवणूक सल्लागारांकडूनच आम्ही याची उत्तरं मिळवली. .'सकाळ मनी'साठी लेखन करणारे आणि सनदी लेखापाल म्हणून कारकीर्द असलेले दिलीप सातभाई यांनी budget2024नंतर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या तीन क्षेत्रांवर लक्ष असू द्यासंरक्षण क्षेत्र - संरक्षण क्षेत्रातील वाढ मोठी आहे.त्यामुळे या शेअर्सवर मुद्दाम लक्ष ठेवा. त्यात गुंतवणूक करा. सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्या - सरकारी कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या हे दोन्ही वेगळे घटक आहेत. मात्र दिलीप सातभाई सांगतात की, मोदी सरकारचे धोरण या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पाठिंबा देण्याचे दिसते. त्यामुळेच खासगी क्षेत्राऐवजी या कंपन्यांना कंत्राट देणे वाढताना दिसतेय. साहजिकच अधिक कंत्राटे मिळत असल्यास शेअरच्या भावात वाढच होणार आहे. उदा. ओएनजीसी. शिवाय हे शेअर्स काहीशा कमी भावात उपलब्ध आहेत त्यामुळे ते जरुर विकत घ्यावेत. टॉप टेन कंपन्या - खासगी कंपन्यांत गुंतवणूक करताना अर्थातच ज्या टॉप टेन कंपन्या आहेत. त्यातील गुंतवणूक कधीही फायद्याचीच ठरेल. मात्र इथे गुंतवणूक करताना थोडं थांबायची तयारी हवी. दीर्घपल्ल्याचा विचार व्हावा. या टॉप टेन कंपन्यांतील काही कंपन्या जर नव्याने लिस्टेड झाल्या असतील तर त्यांचाही वर्षभरातला रेकॉर्ड पाहून त्यात गुंतवणूक करायला हरकत नाही. उदा. जिओ ही रिलायन्स उद्योगसमूहाचीच कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळू शकेल..दुसरीकडे ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सुहास राजदेरकर म्हणतात, अर्थसंकल्प २०२४ सगळ्यांनीच गांभीर्याने घ्यायला हवा, यात वाद नाही. मात्र अर्थसंकल्पाच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका.अर्थसंकल्पाच्या आहारी जाऊ नका.अर्थसंकल्प २०२४ सगळ्यांनी समजून घ्यायलाच हवा पण अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद जाहीर झाली किंवा नाही यावरुन एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करणारच नाही, असा सरसकट निर्णय घेऊ नये. कारण त्या त्या क्षेत्राची पर्यायाने त्यातल्या शेअर्सची भरभराट होण्याची कारणे, परिस्थिती वेगळ्या असतात. यासाठी त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्राचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, अर्थसंकल्प सुरु झाल्यानंतर रिअल इस्टेटमधील शेअर बरेच खाली गेले, पण तसं का झालं हे समजून घेणं आवश्यक आहे. कॅपिटल गेन अर्थात भांडवली नफ्याविषयक नवीन तरतुदीमुळे इंडेक्सेशनचा लाभ आता मिळणार नाही. याचा परिणाम नवीन घरांच्या खरेदीवरसुद्धा होणार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, रिअल इस्टेट क्षेत्रात शेअर खरेदी करूच नये. मार्केट थोडंसं उतरलं जरी असेल तरी या पडत्या काळात चांगल्या विकासकांचे शेअर विकत घ्यायला हरकत नाही. विशेषत: जेव्हा त्यांच्या किंमती काहीशा कमी असतील. जर तुम्ही त्या विकासकाच्या एकूण प्रकल्पांचा, त्याच्या कंपनीच्या वाटचालीचा अंदाज घेऊन गुंतवणुक कराल तर ती नक्कीच फायद्याची ठरेल. .Budget 2024: लगीन घाई असणाऱ्यांना आनंदाची बातमी; अर्थमंत्र्यांनी फिरवली जादूची छडी आणि सोन्या-चांदीचे दागिने होणार स्वस्त.त्याचबरोबर राजदेरकर यांनी सोन्याचे दागिने घडवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचाही सल्ला दिला. उदा. पीएनजी, टायटन, कल्याण ज्वेलर्स.ते म्हणाले, आज अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्कात घट झाली आहे. त्यामुळे अर्थातच सोन्याची किंमत कमी झाली आहे. आता लोक सोन्याचे दागिने अधिक घेतील, अशी अपेक्षा आहे. कारण सोनं स्वस्त झाल्यामुळे ते घेऊन ठेऊ, असा अनेकांचा कल दिसतो. म्हणूनच दागिने घडवणाऱ्या, बनवणाऱ्या ज्या कंपन्या लिस्टेड आहेत, त्यांना चांगली मागणी येईल..पायाभूत सुविधांचं महत्त्वराजदेरकर म्हणाले, जी पायाभूत सुविधांची क्षेत्र आहेत, अशा क्षेत्रात गुंतवणूक जरुर करायला हवी. कारण ही अशी क्षेत्र आहेत, ज्यांसाठी प्रत्येक सरकार कायमच गुंतवणूक करणार आहे. उदा. वीज, रेल्वे, संरक्षण, इन्फ्रा, आयटी. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा या क्षेत्रांत कोणतेही सरकार आले तरी गुंतवणूक राहणारच आहे. शिवाय या सगळ्या क्षेत्रातील उत्पादने, सेवा या आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहेत, त्यावर परिणाम करतात. त्यामुळे यामधील शेअर्सचा विचार जरुर करावा. .Union Budget 2024 Capital Gains Tax: लाँग टर्म कॅपिटल म्हणजे काय? अर्थसंकल्पात कोणते बदल झाले ज्यामुळे शेअर बाजार कोसळला?.गुंतवणूक करा पण...ज्यांचा शेअर मार्केटविषयी फारसा अभ्यास नाही, रोज त्यातले अपडेट्स घेणे शक्य नाही आणि मोठी जोखीम घेता येणार नाही, अशा गुंतवणूकदारानी थेट शेअर बाजारात गुंतवणुक करण्याऐवजी एसआयपीमार्फत म्युच्यअल फंडात गुंतवणुक करावी. या ठिकाणीही जोखीम आहे, पण भुईसपाट करेल अशी नाही. अशा लोकांनी सेक्टोरिअल फंड्सकडे जाण्यापेक्षा मल्टी कॅप मध्ये जावं, असा सल्ला राजदेरकर देतात. कारण या ठिकाणी थोडी कमी जोखीम असते. .रेल्वेसाठी काहीच तरतुद नाही, मग रेल्वेच्या शेअर्सवर विश्वास कसा ठेवायचा?राजदेरकर म्हणतात, रेल्वे हे दळणवळणाचं मह्त्वाचं साधन आहे. त्यामुळे रेल्वे संबंधित स्टॉक्स वर राहणारच आहेत. आता रेल्वे अपघात कमी करण्याच्या विशेष प्रयत्नात आहे त्यामुळे अशाप्रकारे सुरक्षेसंदर्भात जे स्टॉक्स असतात त्यांना महत्त्व राहणार आहेच. उलट हे स्टॉक्स जर तात्पुरते खाली गेले असतील तर ते घेऊन ठेवा..Budget 2024: रेल्वेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून कोणतीही मोठी घोषणा नाही; तज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त.संरक्षण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यासनदी लेखापाल असलेले दिलीप सातभाई यांच्याप्रमाणेच गुंतवणुक सल्लागार सुहास राजदेरकरसुद्धा संरक्षण क्षेत्रासंबंधी आशावादी दिसले. ते म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील निर्यात २०३०पर्यंत ११ लाख कोटीवर जाईल अशी अपेक्षा आहे. कोणत्याही राष्ट्राची सुरक्षा महत्त्वाची असतेच. त्यामुळे या क्षेत्रातील शेअर्स कायमच उंचावर असणार आहेत. शिवाय या क्षेत्रात सध्या जेमतेम २५ स्टॉक्स आहेत..पॉवरची पावरउर्जा क्षेत्र अत्यंत महत्ताचे आहे. तुमचे घर असो वा व्यवसाय उर्जेची गरज वाढतीच असते. हे क्षेत्र महिन्याला १० टक्क्यांची वाढ दाखवतं आहे. त्यामुळे त्यातील एनटीपीसी असेल किंवा टाटा पॉवर या शेअर्सचा विचार करायला हरकत नाही. बँकाबँकांवर देशाचं अर्थकारण अवलंबून असतं. बँकेत पैसे ठेऊन गुंतवणूक कराल न कराल हा तुमचा निर्णय मात्र बँकांच्या स्टॉक्समध्ये जरुर गुंतवणूक कराल, असा सल्ला राजदेकर यांनी दिला. (शेअरविषयी गुंतवणूक करताना त्या काळातील बाजार परिस्थितीचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.