मला मेकअप करायचाच आहे, या मुलांच्या हट्टाला कसं उत्तर द्यायचं? त्यांच्या कोवळ्या त्वचेसाठी खरंच मेकअप योग्य की अयोग्य ? कोणती उत्पादनं वापरायची? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं वाचा, तज्ज्ञांकडूनच..''आई माझ्या गुलाबी फ्रॉकवर लावायला तुझी गुलाबी लिपस्टिक देशील ना?'' - इति त्रिशा वय वर्षे ४''शरण्याची आई तर तिला मस्त मेकअप करून देते. तू मला साधं कॉम्पॅक्टपण लावायला देत नाहीस?''- इति ईश्वरी वय वर्षे ७सणासुदीच्या दिवसांत या चर्चा घराघरांमध्ये ऐकू येतात. विशेषत: मुलींच्या पालकांकडे तर येतातच. लहान मुलींनी मेकअप करूच नये, त्यांच्या त्वचेसाठी ते कसं योग्य नाही, याबद्दलचे व्हॉट्सअप फॉरवर्ड तर आपण सगळेच वाचतो पण खरी परिस्थिती तशी असते का?तुम्ही घरी कितीही नाही सांगितलं तरी मुलींवर त्यांच्या पीअर्सचं अर्थात त्यांच्या समवयस्कांचा एक दबाव असतोच.माझी मैत्रीण करते मग मी का नाही, हा प्रश्न वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मुली त्यांच्या आई-बाबांना विचारतातच. मग मेकअपच्या बाबतीत करायचं काय?खास लहान मुलांसाठीची मेकअप प्रॉडक्ट्स खरोखरच चाइल्ड फ्रेंडली असतात का?.यासंदर्भात त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा वैद्य लाठी(MBBS, Diploma in Dermatology) यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. .मुलांना मेकअप करावा का?मुलांना मेकअप खरंतर करूच नये. लहान मुलांना पावडरही लावू नये. पावडरने कोरडेपणा वाढतो. टाल्क बेस असतो त्यामुळे कोरडेपणा वाढून मुलांना दीर्घकालीन त्रास होऊ शकतात. ब्राँकायटिस, अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे पावडर नकोच. महत्त्वाचं म्हणजे वासाची पावडर अजिबात नको. अगदी तान्ह्या मुलांना मेकअप करूच नये. त्यांच्या चेहऱ्याला काहीच लावू नये..मुलांना मेकअप कोणत्या वयापासून करावा?पण पीअर प्रेशर असेल किंवा आई-ताई यांना बघून असेल मुलींना मेकअप करायचाच असतो. मग अशावेळी काय करायचं हा पालकांपुढे प्रश्नच असतो. अशावेळी डॉ अनुजा सांगतात, थोड्याशा मोठ्या मुलांना थोडा मेकअप केला तरी चालेल. म्हणज ४-५ वर्षांपुढच्या मुलांना. मात्र त्यांनासुद्धा फार हेवी मेकअप नकोच. .मुलांना मेकअप करताना काय लक्षात ठेवायचं?मुलांसाठी मेकअप करताना सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावा. त्यावर लूझ पावडर लावावी. मोठ्यांसाठीची कॉम्पॅक्ट लहान मुलांसाठी उपयोगाची नाही. कारण कॉम्पॅक्टमुळे त्वचेवरची छिद्र बंद होतात. ते करू नये. कॉम्पॅक्टच्या ऐवजी मुलांना टाल्क म्हणतो तशी लूझ पावडर लावली तरी चालेल. .लिपस्टिक लावताना काय काळजी घ्यावी?सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिपस्टिक विकत घेताना ती कोणतेही वासविरहित घ्यावी. तिला कोणतेही सुगंध, सुवास नकोतच. मुलांच्या लिपस्टिकला साधारण स्ट्रॉबेरी, बबलगम असे फ्लेवर असतात कधीकधी गोडसर सुंदर वास असतात. होतं असं की मुलांना ते आवडतात. त्यामुळे चक्क मुलं अशी लिपस्टिक खातात. त्यावरून मुद्दाम जिभ फिरवतात. त्यांना कळत नाही पण असं करणं त्यांच्यासाठी हानीकारक असतं. मॅट फिनिशवाल्या लिपस्टिक मुलांसाठी अजिबात वापरू नयेत. हायड्रेटिंग लिपबाम किंवा अगदी फिकट छटेची लिपस्टिक लावली तरी चालेल. लिपस्टिक किंवा लिपबाम असं हवं की जे, थोड्याच वेळात आपसूक निघून जाईल. शेवटी ही बाहेरची गोष्ट आहे ती त्वचेवर फारकाळ राहणं चुकीचं आहे. काहीवेळा गालावर ब्लश म्हणून लिपस्टिकच लावतात. हे अगदीच चुकीचं आहे. लहानांच्या बाबतीत तर ते नकोच पण मोठ्यांनीही टाळावं..मुलांच्या डोळ्यात काजळ घालावे का? आयलायनर लावावे का?अजिबात नाही. काजळ, आयलायनर वगैरे घातल्यामुळे डोळ्यांच्या मेबोमियन ग्लांड्सना धोका पोहोचू शकतो. Meibomian glands म्हणजे पापणीच्या आवरणाच्या आतल्या बाजूला असलेल्या तैल ग्रंथी असतात. डोळ्यातील अश्रूंसाठी या ग्रंथी अत्यंत महत्त्वाच्या असतात. काजळ अथवा आयलायनर लावल्याने त्या ग्रंथी ब्लॉक होतात. त्यांच्या कार्यात अडथळा येतो. साहजिकच त्यामुळे विविध प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. काही अॅलर्जीज येऊ शकतात. दुसरं म्हणजे आयलायनर काढायचं म्हटलं तरी मुलं ते पटकन काढू देत नाहीत. त्यामुळे ते अधिक काळ त्वचेवर राहतं आणि अधिक हानीकारक ठरतं. त्यामुळे डोळ्यांच्या कडेने मेकअप नकोच..लहान मुलांसाठी फाऊंडेशन वापरावं का?खरं उत्तर नाही हेच आहे. कारण फाऊंडेशनमुळे त्वचेची छिद्र बंद होतात. त्यातून त्वचेतील कोरडेपणा वाढतो. खरंतर फाऊंडेशन वापरण्याचं आदर्श वय आहे, १७-१८वर्षे आणि त्याच्यापुढे. १० वर्षांखालील मुलांना तर फाऊंडेशन लावूच नये.पण अगदी वापरायचंच असेल तर हायड्रेटिंग फाऊंडेशन वापरावं. जे अगदी घामाने किंवा पाण्यानेही निघून जाईल. थोडक्यात त्वचेवर जास्तकाळ राहणार नाही. .आयशॅडो आणि हायलायटरमधली चकमक धोकादायकआयशॅडे आणि हायलायटरमध्ये एक चकाकी देणारा घटक असतो. अगदी आपण मोठेसुद्धा जेव्हा ते लावतो तेव्हा लक्षात येतं की, एकवेळ त्याचा रंग निघून जातो पण ती चकमक बोटांवर राहते. हाताला, ब्रशलासुद्धा ही चकमक चिकटलेली असते. २४ तास अशी एखादी गोष्ट आपल्या त्वचेवर चिकटून राहणं मुळीच योग्य नाही. त्यामुळे आयशॅडो, हायलायटर लहान मुलांसाठी शक्यतो वापरूच नये..मग मुलांसाठी मेकअप प्रोडक्ट निवडताना काय काय लक्षात ठेवायचं?खरंतर मुलांसाठी कोणतंही स्किनकेअर उत्पादन निवडताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेलं बरं.मुलांसाठी प्रोडक्ट निवडताना ते पॅराबेन फ्री (paraben free) असायला हवं.लहान मुलांसाठी बेबी मॉइश्चरायझरचा जरुर वापर करावा पण महत्त्वाची अट म्हणजे त्याला कोणताही सुवास, सुगंध नको. त्यात इमोलीन (emolene), सिरामाइड (ceramide ) असेल तर उत्तम. महाग म्हणजे उत्तम असं नव्हे.आपली एक साधारण समजूत असते, महाग उत्पादन म्हणजे उत्तम उत्पादन. पण तसं नाही. कोणतंही उत्पादन घेताना त्यातील घटक पाहून घ्या. परदेशी आहे म्हणजे उत्तमच असणार, असा आणखी एक समज असतो. तेही खरं नाही. कोणत्या कंपनीने कशासाठी बनवला आहे, हे पाहून घ्या. अनेक भारतीय कंपन्यांची उत्पादनंही उत्तम असतात.दुसरं म्हणजे एखादं महाग क्रीम तुम्ही घेतलं पण ते कायम लावायचं असेल तर परवडणार कसं? शिवाय एकदाच वापरलं आणि मग सोडून दिलं असं केलंत तरी त्वचेला ते हानीकारक आहे. त्यामुळे कोणतंही सौदर्यप्रसाधन निवडताना त्यातील घटक, किंमत, आपल्या त्वचेसाठी काय उपयुक्त आहे या सगळ्याचा विचार करून निवडा..मेकअप जास्तीतजास्त किती वेळ ठेवावा?साधारण तासभर मेकअप ठेवला तरी खूप जास्त झालं. मुलांच्या त्वचेवर मेकअप जास्त काळ ठेऊच नये. टीनएजमधल्या मुलांनी थोडा अधिक काळ ठेवला तरी चालेल एकवेळ पण दिवसभर वगैरे नकोच.ज्यांना पिंपल्स किंवा तारुण्यपिटिका येतात, ज्यांच्या त्वचेवर चरे पडलेले आहेत, त्वचा कोरडी झाली आहे. त्यांनी मेकअप लावूच नये. .मेकअप काढताना कोणती काळजी घ्यावी?मेकअप काढताना मायसिलर वॉटर micellar water चा वापर करता येतो. मात्र ते थोडं खर्चिक असतं. त्याऐवजी तुम्ही एखादं फेस न येणारं मलम घेतलं किंवा मॉइश्चरायझर घेतलं तरी चालेल. मेकअप काढताना हे मॉइश्चरायझर लावून तो काढा त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा मॉइश्चरायझर लावा. आयलायनर काढताना इयरबडने किंवा बोटाने थोडंसं क्रीम लावा त्यानंतर स्वच्छ सुती रुमाल किंवा cotton wipesनी ते आयलायनर काढा. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.